शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

राळेगाव वसतिगृहातील विद्यार्थी चार दिवसांपासून उपाशी

By admin | Updated: September 18, 2014 00:04 IST

भोजन पुरवठा ठेकेदाराने मेस बंद केल्याने राळेगाव येथील वसतिगृहातील २८ विद्यार्थी गेल्या चार दिवसांपासून उपाशी आहे. वसतिगृह अधीक्षकांनी या विद्यार्थ्यांना घरी जाण्याचा सल्ला दिला तर समाज कल्याण विभाग

अशोक पिंपरे - राळेगाव भोजन पुरवठा ठेकेदाराने मेस बंद केल्याने राळेगाव येथील वसतिगृहातील २८ विद्यार्थी गेल्या चार दिवसांपासून उपाशी आहे. वसतिगृह अधीक्षकांनी या विद्यार्थ्यांना घरी जाण्याचा सल्ला दिला तर समाज कल्याण विभाग उडवाउडवीची उत्तरे देत आहे. राळेगाव येथे समाज कल्याण विभागांतर्गत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आहे. या वसतिगृहात आठवी ते दहावीमध्ये शिक्षण घेणारे २८ विद्यार्थी आहे. गेल्या दोन महिन्यांंपासून विद्यार्थ्यांना अनियमित भोजन दिले जात होते. तसेच सकस आहारही पुरविला जात नव्हता. त्यामुळे विद्यार्थी हतबल झाले होते. अर्धपोटी उपाशी राहून शाळेत जात होते. आता तर १३ सप्टेंबरपासून वसतिगृहाला भोजन पुरविणाऱ्या ठेकेदाराने आपली मेसच बंद केली. विशेष म्हणजे मेसचे कंत्राट १५ आॅगस्ट रोजीच संपले होते. परंतु कंत्राटदाराने मानवतेच्या दृष्टीकोणातून इतके दिवस विद्यार्थ्यांना भोजन दिले. आता मेस बंद झाल्याने विद्यार्थ्यांच्या भोजनाचा प्रश्न निर्माण झाला. दरम्यान भोजन मिळत नसल्याने या विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या अधीक्षकांची भेट घेतली. त्यावेळी सर्व विद्यार्थ्यांना घरी जाण्याचा सल्ला दिला. यातील बहुतेक विद्यार्थी दहावी-बारावीतील असून अभ्यास बुडणार असल्याने गावाकडे कसे जावे असा प्रश्न आहे. याबाबत समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्याला विचारले असता आपण राळेगाव वसतिगृहाच्या अधीक्षकांशी चर्चा करतो, असे उडवाउडवीचे उत्तर दिले. या विद्यार्थ्यांनी राळेगाव तहसीलदारांना निवेदन दिले.