शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

एसटीला सलग तिसऱ्या दिवशी आंदोलनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2021 05:00 IST

या संपाचा परिणाम म्हणून महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या. त्यामुळे सर्व वाहतूक सुरळीत होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, अशी मागणी रेटून धरली. याही दिवशी काही कामगार संपावर गेले होते. परिणामी दुसऱ्या दिवशी १४ ते १५ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी महामंडळातील काही कर्मचारी संपात उतरले आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी महामंडळाच्या यवतमाळ विभागाला आर्थिक फटका बसला. शनिवारी सुमारे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले.गुरुवारी कर्मचारी कृती समितीच्या पुढाकारात विभागीय पातळीवर उपोषण करण्यात आले. यातून काही मार्ग न निघाल्यास बेमुदत बंदचा पवित्रा एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला. दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील जवळपास आगारातील वाहतूक बंद होती. यादिवशी यवतमाळ विभागाला ३० ते ३५ लाख रुपयांच्या उत्पन्नाला मुकावे लागले.या संपाचा परिणाम म्हणून महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या. त्यामुळे सर्व वाहतूक सुरळीत होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, अशी मागणी रेटून धरली. याही दिवशी काही कामगार संपावर गेले होते. परिणामी दुसऱ्या दिवशी १४ ते १५ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले.शनिवारी तिसऱ्या दिवशीही विलीनीकरणाची मागणी लावून धरत काही कर्मचारी संपावर गेले. पांढरकवडा आगाराच्या पूर्ण बसफेऱ्या थांबल्या. दिग्रस आणि राळेगाव आगारात २५ टक्क्यांहून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. यादिवशीही आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान एसटीला सहन करावे लागले.

बाहेरच्या आगाराची मदत- पांढरकवडा, दिग्रस आणि राळेगाव आगारातील बसफेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बाहेरच्या आगाराची मदत घेण्यात आली. पांढरकवडा येथे वणीच्या बसेस बोलावण्यात आल्या. दिग्रस येथे वाहतुकीसाठी पुसदची, तर राळेगावकरिता यवतमाळ आगारातून बस रवाना करण्यात आल्या. तरीही नेहमीइतक्या फेऱ्या होऊ शकल्या नाही. वणी आगाराने चंद्रपूरसाठी मदत पोहोचविली. 

कर्मचाऱ्यांना ताकीद- कामावर हजर व्हा, नाहीतर सेवा समाप्तीसारखी कारवाई केली जाईल, अशी ताकीद संपावरील कर्मचाऱ्यांना महामंडळाने दिली आहे. यवतमाळ विभागातील १५० हून अधिक कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. पांढरकवडा आगारातील ३२, यवतमाळ २२, राळेगाव ४८ आणि दिग्रस आगारातील २२ कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणासाठी संपात उडी घेतली आहे.

 

टॅग्स :state transportएसटी