शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या महिला वाहकाला मारहाण

By admin | Updated: October 4, 2014 23:33 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या महिला वाहकाला प्रवाशांनी बेदम मारहाण केली. ही घटना तालुक्यातील तोंंडोळी येथील बस थांब्यावर शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. गंभीर अवस्थेत महिला

तोंडोळीची घटना : गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल आर्णी : राज्य परिवहन महामंडळाच्या महिला वाहकाला प्रवाशांनी बेदम मारहाण केली. ही घटना तालुक्यातील तोंंडोळी येथील बस थांब्यावर शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. गंभीर अवस्थेत महिला वाहकाला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सत्यभामा रत्नाकर गादेकर (२५) रा. दारव्हा असे जखमी महिला वाहकाचे नाव आहे. दारव्हा आगाराची बस शनिवारी सकाळी १० वाजता तोंडोळी येथील बस थांब्यावर आली. बसमध्ये प्रवाशांची गर्दी होती. त्यामुळे वाहकाने केवळ शालेय विद्यार्थ्यांनी बसमध्ये बसावे, असे म्हटले. यामुळे थांब्यावर बसची प्रतीक्षा करणारे प्रवासी संतापले. काही कळायच्या आत सत्यभामा गादेकर यांना मारहाण सुरू झाली. या मारहाणीत तिला जबर मार लागला असून श्वास घेण्यास त्रास होत होता. तिला बस चालक देवराव पवार आणि विद्यार्थ्यांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने तिला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले. या प्रकरणी आर्णी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून अज्ञात प्रवाशांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)