पुसदमध्ये सात दिवस कडकडीत बंदची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 05:00 AM2020-07-13T05:00:00+5:302020-07-13T05:00:24+5:30

पाच-सहा दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. कोरोनाला रोखण्यासाठी शुक्रवारी लोकप्रतिनिधी, व्यापारी, डॉक्टर, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व अधिकारी यांची बैठक झाली. बैठकीला तीन आमदारांसह चेंबर आॅफ कॉमर्स व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय प्रशासनावर सोपविण्यात आला होता.

Strict closure announced for seven days in Pusad | पुसदमध्ये सात दिवस कडकडीत बंदची घोषणा

पुसदमध्ये सात दिवस कडकडीत बंदची घोषणा

googlenewsNext
ठळक मुद्दे१५ ते २१ जुलै : औषधी दुकाने वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद, भाजीपाला विक्रीवर घातले निर्बंध

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : गेल्या काही दिवसांपासून शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. तूर्तास तालुक्यात १८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने १५ ते २१ जुलैपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या सात दिवसात केवळ दवाखाने आणि औषधी दुकाने वगळता इतर सर्व दुकाने व सेवा बंद ठेवल्या जाणार आहे.
पाच-सहा दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. कोरोनाला रोखण्यासाठी शुक्रवारी लोकप्रतिनिधी, व्यापारी, डॉक्टर, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व अधिकारी यांची बैठक झाली. बैठकीला तीन आमदारांसह चेंबर आॅफ कॉमर्स व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय प्रशासनावर सोपविण्यात आला होता. त्यानुसार रविवारी उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांनी १५ ते २१ जुलैपर्यंत शहरासह ग्रामीण भागात लॉकडाऊन घोषित केला.
शहर व ग्रामीण भागात सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत नाही. अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडतात, अनावश्यक प्रवास करतात, बाजारात गर्दी करतात, अनेकजण मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करीत नाही, घराच्या आजूबाजूला जमाव करून बसतात. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्याला आळा घालण्यासाठी प्रशासनाने रविवारी कठोर पाऊल उचलले.
जिल्हाधिकारी एम. डी. सिंग यांच्या मार्गदर्शनात प्रशासनाने १५ ते २१ जुलैदरम्यान सात दिवस लॉकडाऊन घोषित केले. शहरासह शेंबाळपिंपरी, जांबबाजार, बेलोरा येथील बाजारपेठ पूर्णपणे बंद राहणार आहे. या बंदच्या कालावधीत कुणीही आपल्या घराच्या बाहेर पडू नये किंवा आपल्या परिसरात एकत्रित येऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. शहरातील प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांनी कोरोना योद्ध्यांची जवाबदारी स्वीकारली आहे. नगरसेवक आपल्या प्रभागात प्रशासनाला मदत करणार आहे.
नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. अन्यथा नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांनी दिला आहे.

मॉर्निंग व इव्हिनिंग वॉकलाही बंदी
दवाखाने व औषधी दुकाने वगळता सर्व बाजारपेठ बंद राहणार आहे. यात किराणा दुकान व दुधाचाही समावेश आहे. सोबतच भाजीपाला विक्रीही करता येणार नाही. याशिवाय मॉर्निंग व इव्हिनिंग वॉकलासुद्धा बंदी घालण्यात आली. तालुक्याची कोरोना रुग्णसंख्या ३२ वर पोहोचल्याने हा निर्णय घेण्यात आला. तूर्तास तालुक्यात १८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे. १३ जण बरे होऊन घरी परतले. एकाचा मृत्यू झाला. अद्याप ५८ जणांचे रिपोर्ट अप्राप्त आहे. पुसदमध्येच शनिवारपासून रॅपिट टेस्ट केली जात आहे.

Web Title: Strict closure announced for seven days in Pusad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.