शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण तणाव

By admin | Updated: March 7, 2017 01:28 IST

मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण तणाव आहे. वाढत्या तणावामुळे मनुष्य रुग्ण होत आहे. मनुष्याचे ८५ टक्के आजार मनाच्या कमजोरीमुळे होतात.

प्रभा मिश्रा : पुसद येथे आध्यात्मिक शिबिराला भाविकांचा प्रतिसादपुसद : मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण तणाव आहे. वाढत्या तणावामुळे मनुष्य रुग्ण होत आहे. मनुष्याचे ८५ टक्के आजार मनाच्या कमजोरीमुळे होतात. आपण सकारात्मक विचार केल्यास आजारी पडणारच नाही. व्यक्ती २४ तासात ३० ते ४० हजारवेळा विचार करतो. जास्त वेगाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु अशा पद्धतीमुळे सकारात्मक विचार कमी होतात व आपल्या जवळचे लोकही सुटून जातात, असे प्रतिपादन डॉ.प्रभा मिश्रा यांनी केले.प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पुसद केंद्राच्यावतीने आयोजित आध्यात्मिक शिबिरात ‘तणावमुक्त जीवन’ या विषयावर प्रभादिदी बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, आपली आजची जीवनशैली अतिशय जलद झाली असून यावर आपले नियंत्रण नसल्यास तणावात वाढ होईल. आपण इतरांशी खूप बोलतो. परंतु स्वत:सोबत संवाद साधत नाही. पर्यटनस्थळावर जाण्याने सुख मिळणार नाही. यासाठी स्वत:मध्ये झाकून पाहावे लागेल. आपल्यातील क्षमता असिम आहे. मनुष्य शक्तिमान आहे. त्या शक्तीला समजून घेऊन त्याचा उपभोग केला पाहिजे. अहम्भाव बाजूला सारता आला पाहिजे. खोटा अहंकार दाखवू नये व खोटा दिखावा करू नये. यामुळेही तणावात वाढ होते, असेही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली होती. (तालुका प्रतिनिधी)