शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

खर्ऱ्याच्या वादातून तुफान दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:00 IST

बोरगाव येथे गावात चोरून खर्रा विक्री होते काय, याची पडताळणी करण्यासाठी पोलीस पथक आले होते. तेथील एका पानटपरी चालकाकडे या पथकाने खर्रा विक्री करतो काय, अशी चौकशीही केली. त्याचवेळेस एक युवक खर्रा मागायला तेथे आला. चौकशी करून पोलीस पथक निघून गेले. नंतर त्या पानटपरी चालकाने त्या युवकाला चोप दिला. यावरून दोन समाजाचे गट रस्त्यावर उतरले.

ठळक मुद्देलाडखेड हद्दीत बोरगावची घटना : दोघे जखमी, पोलीस बंदोबस्तानंतर तणाव निवळला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खर्रा हा मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. यवतमाळ शहरात कोरोना विषाणू संसर्ग फैलावण्यासाठी खर्रादेखील कारणीभूत असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले. आता हाच खर्रा लाडखेड ठाण्यांतर्गत येत असलेल्या बोरगाव येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न बनला आहे. खर्ऱ्यावरून या गावात रविवारी रात्री दोन गटात तुफान दगडफेक झाली.बोरगाव येथे गावात चोरून खर्रा विक्री होते काय, याची पडताळणी करण्यासाठी पोलीस पथक आले होते. तेथील एका पानटपरी चालकाकडे या पथकाने खर्रा विक्री करतो काय, अशी चौकशीही केली. त्याचवेळेस एक युवक खर्रा मागायला तेथे आला. चौकशी करून पोलीस पथक निघून गेले. नंतर त्या पानटपरी चालकाने त्या युवकाला चोप दिला. यावरून दोन समाजाचे गट रस्त्यावर उतरले. परस्परावर दगडफेक करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलीस पाटील रवींद्र कनाके यांनी लाडखेड ठाणेदार विनय कारेगावकर यांना घटनेची माहिती दिली. तत्काळ पोलीस बोरगाव येथे पोहोचले. नंतर दोनही गटांनी सामोपचाराची भूमिका घेत तक्रार देण्याचे टाळले. मात्र गावात तणावाची परिस्थिती कायम आहे. त्यामुळेच येथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याची माहिती ठाणेदार विनय कारेगावकर यांनी दिली.खर्रा मानवी आरोग्यासोबतच सामाजिक स्वास्थ्यालाही किती घातक ठरतोय हे बोरगावच्या घटनेवरून दिसून येते. गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या या गावात खर्ऱ्याच्या वादातून सरळसरळ दोन गट पडले आहे.

टॅग्स :Socialसामाजिक