खर्ऱ्याच्या वादातून तुफान दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:00 IST2020-05-05T05:00:00+5:302020-05-05T05:00:44+5:30

बोरगाव येथे गावात चोरून खर्रा विक्री होते काय, याची पडताळणी करण्यासाठी पोलीस पथक आले होते. तेथील एका पानटपरी चालकाकडे या पथकाने खर्रा विक्री करतो काय, अशी चौकशीही केली. त्याचवेळेस एक युवक खर्रा मागायला तेथे आला. चौकशी करून पोलीस पथक निघून गेले. नंतर त्या पानटपरी चालकाने त्या युवकाला चोप दिला. यावरून दोन समाजाचे गट रस्त्यावर उतरले.

Storm throwing stones at the real argument | खर्ऱ्याच्या वादातून तुफान दगडफेक

खर्ऱ्याच्या वादातून तुफान दगडफेक

ठळक मुद्देलाडखेड हद्दीत बोरगावची घटना : दोघे जखमी, पोलीस बंदोबस्तानंतर तणाव निवळला

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : खर्रा हा मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. यवतमाळ शहरात कोरोना विषाणू संसर्ग फैलावण्यासाठी खर्रादेखील कारणीभूत असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले. आता हाच खर्रा लाडखेड ठाण्यांतर्गत येत असलेल्या बोरगाव येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न बनला आहे. खर्ऱ्यावरून या गावात रविवारी रात्री दोन गटात तुफान दगडफेक झाली.
बोरगाव येथे गावात चोरून खर्रा विक्री होते काय, याची पडताळणी करण्यासाठी पोलीस पथक आले होते. तेथील एका पानटपरी चालकाकडे या पथकाने खर्रा विक्री करतो काय, अशी चौकशीही केली. त्याचवेळेस एक युवक खर्रा मागायला तेथे आला. चौकशी करून पोलीस पथक निघून गेले. नंतर त्या पानटपरी चालकाने त्या युवकाला चोप दिला. यावरून दोन समाजाचे गट रस्त्यावर उतरले. परस्परावर दगडफेक करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलीस पाटील रवींद्र कनाके यांनी लाडखेड ठाणेदार विनय कारेगावकर यांना घटनेची माहिती दिली. तत्काळ पोलीस बोरगाव येथे पोहोचले. नंतर दोनही गटांनी सामोपचाराची भूमिका घेत तक्रार देण्याचे टाळले. मात्र गावात तणावाची परिस्थिती कायम आहे. त्यामुळेच येथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याची माहिती ठाणेदार विनय कारेगावकर यांनी दिली.
खर्रा मानवी आरोग्यासोबतच सामाजिक स्वास्थ्यालाही किती घातक ठरतोय हे बोरगावच्या घटनेवरून दिसून येते. गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या या गावात खर्ऱ्याच्या वादातून सरळसरळ दोन गट पडले आहे.

Web Title: Storm throwing stones at the real argument