शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बिनपगारी शिक्षकांचे हातावर पोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 05:00 IST

दोन विषयात एम.ए. बी.एड. झालेल्या उमेदवारांनी पुढील काळात केव्हातरी अनुदान मिळेल या आशेवर विनाअनुदानित महाविद्यालयांवर शिक्षक म्हणून नोकरी पत्करली. शाळेत यायचे, विद्यादान करायचे आणि घरी गेल्यावर पोटापाण्याची सोय म्हणून इतर कामे करायची, हा त्यांचा नित्यक्रम सुरू आहे. राज्यभरात सुमारे २२ हजार, तर यवतमाळ जिल्ह्यात २५० शिक्षकांचा हा प्रश्न आहे.

ठळक मुद्देविनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालय : २० वर्षांपासून पगार नाही, आता धरणे व उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयावर कार्यरत असलेल्या शिक्षकांना गेली २० वर्षांपासून पगार नाही. विद्यादान करतानाच इतर प्रकारची कामे करून त्यांना गुजराण करावी लागत आहे. अनुदानाचा प्रश्न मार्गी लावून पगार सुरू व्हावा, या मागणीसाठी आता या शिक्षकांनी तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली आहे.दोन विषयात एम.ए. बी.एड. झालेल्या उमेदवारांनी पुढील काळात केव्हातरी अनुदान मिळेल या आशेवर विनाअनुदानित महाविद्यालयांवर शिक्षक म्हणून नोकरी पत्करली. शाळेत यायचे, विद्यादान करायचे आणि घरी गेल्यावर पोटापाण्याची सोय म्हणून इतर कामे करायची, हा त्यांचा नित्यक्रम सुरू आहे. राज्यभरात सुमारे २२ हजार, तर यवतमाळ जिल्ह्यात २५० शिक्षकांचा हा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक-कनिष्ठ महाविद्यालय, शाळा कृती संघटनेच्या माध्यमातून अनुदानाच्यादृष्टीने विविध प्रकारची आंदोलने करण्यात आली. दरम्यानच्या काळात १४६ कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान मंजूर करण्यात आले. पुरवणी मागणीत १०७ कोटी रुपये मंजूर झाले. परंतु ते कागदावरच राहिले आहे.४ आॅगस्ट रोजी संघटनेमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. वित्त विभागाने तपासलेली फाईल मंजूर करून गेली २० वर्षांपासून पगार नसलेल्या शिक्षकांना न्याय द्यावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. यावर निर्णय न झाल्यास गुरुवार, ६ आॅगस्टपासून राज्यव्यापी धरणे, उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.संघटनेचे राज्य संघटक तथा जिल्हाध्यक्ष प्रा. पुरुषोत्तम येरेकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. आनंद चौधरी, जिल्हा सदस्य प्रा. अभय जगताप, प्रा. दयावान कांबळे, प्रा. पीयूष देमगुंडे, विभागीय सचिव प्रा. श्रीकांत लाकडे आदींच्या स्वाक्षरीनिशी निवेदन देण्यात आले. वेतनाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात यावा, अशी मागणी या निवेदनातून प्रशासनाकडे करण्यात आली आहे.औरंगाबाद ते मुंबई पदयात्रावेतन मिळावे, या मागणीसाठी औरंगाबाद येथून पाच शिक्षक मुंबईसाठी पायदळ निघाले आहेत. आतापर्यंत केवळ आश्वासन मिळाले आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनीही ३१ जुलैपर्यंत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. ही तारीख निघून गेल्यानंतरही प्रश्न कायम असल्याने या शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक