साठा संपला, कोरोना लसीकरण थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 05:00 AM2021-04-09T05:00:00+5:302021-04-09T05:00:07+5:30

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गुरुवारी सायंकाळपर्यंतसुद्धा लस जिल्ह्यात पोहोचली नसल्याचे स्पष्ट केले आहे. शुक्रवारी ही लस येईल का याबाबत आत्ताच काही सांगता येत नसल्याचेही येडगे म्हणाले. जिल्ह्यात ४५ वर्षांवरील  नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. यापूर्वी फ्रंटलाईन वर्कर, आरोग्यसेवक, शासकीय कर्मचारी यांचेही लसीकरण करण्यात आले.  काही नागरिकांना दुसरा डोसही देण्यात आला आहे.

Stocks ran out, corona vaccination stopped | साठा संपला, कोरोना लसीकरण थांबले

साठा संपला, कोरोना लसीकरण थांबले

Next
ठळक मुद्देजिल्हाभर प्रतीक्षेची वेळ : गुरुवारी सायंकाळीही लस पोहोचल्याच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :  जिल्ह्याला गुरुवारपर्यंत पुरेल एवढाच लसींचा साठा होता. सायंकाळपर्यंत लसींचा पुरवठा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु  प्रत्यक्षात हा पुरवठा न झाल्याने आता गुरुवारपासून जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रांवरील कामकाज ठप्प पडणार आहे. नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी आता प्रतीक्षा करावी लागणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गुरुवारी सायंकाळपर्यंतसुद्धा लस जिल्ह्यात पोहोचली नसल्याचे स्पष्ट केले आहे. शुक्रवारी ही लस येईल का याबाबत आत्ताच काही सांगता येत नसल्याचेही येडगे म्हणाले. 
जिल्ह्यात ४५ वर्षांवरील  नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. यापूर्वी फ्रंटलाईन वर्कर, आरोग्यसेवक, शासकीय कर्मचारी यांचेही लसीकरण करण्यात आले.  काही नागरिकांना दुसरा डोसही देण्यात आला आहे. याच स्थितीत गावपातळीवर जाणीवजागृती होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात लस पाठविण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील लसीकरणाला वेग मिळाला होता. जिल्ह्यात १७८ ठिकाणी लसीकरण सुरू करण्यात आले होते. त्याकरिता आरोग्य विभागाचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले. तर काही ठिकाणी नव्याने तात्पुरती भरतीही करण्यात आली आहे. लसीकरणाची मोहीम वेगाने जात असताना लागणारी लस न मिळाल्याने सोमवारपासून त्याचा प्रभाव जाणवत होता. खासगी लसीकरण केंद्रांवर लस नसल्याने लसीकरण बंद ठेवावे लागले. त्यापाठोपाठ इतरही शासकीय केंद्रांना लस नसल्यामुळे बंद ठेवण्याची वेळ आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांवर अनेकजण लस नसल्याने परत आले. जिल्ह्यात ६१ केंद्रांवर गुरुवारी लस नव्हती. गुरुवारी सायंकाळपर्यंत लस न आल्याने सर्व १७८ केंद्र शुक्रवारी बंद करावे लागणार आहे. दोन सदस्यीय केंद्रीय चमूने येथील पाटीपुरा केंद्रावर भेट दिली. तेथील लस संपली होती. मात्र चमूच्या भेटीमुळे वेळेवर धावपळ करून लस उपलब्ध केली. 

एका ॲम्पुलमध्ये दहा जण लसीकरणासाठी मिळेना
 ग्रामीण भागामध्ये लसीकरणासाठी पाहिजे तशी गतीच नाही. एक ॲम्पुल फोडायचे असेल तर त्याला लागणारे दहा नागरिक येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. त्यानंतरच ॲम्पुल फोडले जाते. यामुळे तासन्‌तास प्रतीक्षेनंतर गर्दी नसलेल्या ठिकाणी लसीकरण होते. तर काही केंद्रांवर निरंक लस दिसत असल्याने आरोग्य विभागाने जितके लोक उपलब्ध होतील, त्यांच्यासाठी लस देण्याची प्रक्रिया सुरू केली. यामुळे काही प्रमाणात लसीचा डोजही वायाही गेला.
 

जिल्ह्याला दिवसभर पुरेल इतकाच लसीचा साठा शिल्लक आहे. नव्याने लसीची मागणी करण्यात आली आहे. सध्या लस उपलब्ध व्हायची आहे. लस आल्यानंतर लगेच वितरण करून लसीकरण प्रक्रिया सुरू होईल. लस नसल्यामुळे कुणीही घाबरण्याचे कारण नाही. लस येणार आहे. 
- अमोल येडगे,  जिल्हाधिकारी, यवतमाळ

केंद्रनिहाय लसीकरण
 पांढरकवडा - ५१७६, दारव्हा - ४६७८, पुसद - ६२८२, उमरखेड - ६३८७, वणी -७८४२, राळेगाव - २००६, आर्णी - ३४८१, दिग्रस - ४२४१, कळंब - २१०४, घाटंजी - २९०६, बाभूळगाव - २१२२, नेर - ३५४७, मारेगाव - १४६०, सवना - ६४३, लोही - ६४४, झरी - ९६५, करंजी - ४७७, यवतमाळ - २८१६८,  ग्रामीणमधील एकूण ६३  प्राथमिक आरोग्य केंद्र - ४८ हजार ५७४.

 

Web Title: Stocks ran out, corona vaccination stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.