शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतींंना ‘क’ वर्ग नगरपरिषदेचा दर्जा

By admin | Updated: April 13, 2015 00:58 IST

तालुका मुख्यालयी असलेल्या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला असून या नगरपंचायतींंना क वर्ग नगरपरिषदेचा

ग्रामसेवकांना परत बोलाविले : हिशेबाचे खाते केले बंद नगरपंचायतीचा प्रमुख राहणार नगराध्यक्षग्रामसेवकांऐवजी मुख्याधिकाऱ्यांची नियुक्तीजिल्हा परिषद शाळा होणार नगरपंचायतीकडे स्थानांतरित रूपेश उत्तरवार ल्ल यवतमाळ तालुका मुख्यालयी असलेल्या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला असून या नगरपंचायतींंना क वर्ग नगरपरिषदेचा दर्जा राहणार आहे. नगरपरिषदेच्या प्रमुखाला नगराध्यक्ष आणि सदस्यांना नगरसेवक म्हणून संबोधले जाणार आहे. अधिसूचना जारी झाल्याने जिल्हा परिषदेने आपल्या हिशेबाचे खाते बंद केले असून ग्रामसेवकांनाही परत बोलाविले आहे. लवकरच या ठिकाणी निवडणूकही होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, बाभूळगाव, महागाव, मारेगाव, कळंब आणि झरी येथील ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे. राज्य शासनाने आदेश काढताच त्या ठिकाणी तहसीलदारांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापुढील काळात ही ग्रामपंचायत नगरपंचायत म्हणून ओळखली जाणार असून त्यांना क वर्ग नगरपरिषदेचा दर्जा राहणार आहे. साधारणत: नगरपरिषद स्थापनेसाठी २५ हजार लोकसंख्येची अट आहे. असे असले तरी नगरपरिषदेचा दर्जा देण्यासाठी प्रारंभी नगरविकास विभागाची अधिसूचना आवश्यक आहे. त्यावर आक्षेप मागविले जातात. त्यानंतर नगरपरिषदेचा दर्जा दिला जातो. मात्र तालुका मुख्यालय असलेल्या अनेक ठिकाणी ही अट पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे तालुका मुख्यालयी असलेल्या ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्याची अधिसूचना जारी करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये नगरपंचायत स्थापन्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. तेथे तहसीलदारांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अधिसूचना जाहीर होताच जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या ग्रामपंचायती बरखास्त झाल्या आहेत. यामुळे जिल्हा परिषदेने आपले आर्थिक व्यवहार थांबविले असून या गावांची ग्रामसेवकाकडील जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. नगरपंचायत म्हणजे काय ?नगरपंचायती म्हणजे नगरपरिषदेचे छोटे स्वरूप राहणार आहे. नगरपंचायतीला क वर्ग नगरपरिषदेचा दर्जा राहणार आहे. या ठिकाणी कारभार सांभाळण्यासाठी ग्रामसेवकांऐवजी मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. सध्या प्रशासक म्हणून तहसीलदारांकडे काम सोपविण्यात आले आहे. निवडणूक अधिसूचना जाहीर झाल्यानंतर बरखास्त ग्रामपंचायतीची नगरपंचायतीसाठी निवडणूक घेतली जाईल. नगरपंचायतीचा प्रमुख नगराध्यक्ष म्हणून ओळखला जाईल. तर सदस्यांना नगरसेवक म्हणून संबोधले जाणार आहे. अनुदानात वाढ होणार नगरपंचायतीला विकासासाठी नगरविकास विभाग निधी देणार आहे. हा निधी ग्रामपंचायतीच्या तुलनेत मोठा राहणार आहे. यामुळे विकास कामात माघारलेल्या तालुका ठिकाणची आर्थिक अडचण दूर होईल. रमाई आवास योजनेसह शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध होईल. यासोबतच घराचा करही वाढणार आहे.कर्मचारी नगरपंचायतीकडेग्रामपंचायतीमध्ये सध्या कार्यरत कर्मचारी नगरपंचायतीकडे हस्तांतरित होतील. त्यांच्या वेतनाची जबाबदारी नगरविकास विभाग पार पाडेल. यासोबतच जिल्हा परिषदेच्या शाळाही नगरपंचायतीकडे स्थानांतरित होतील. या ठिकाणचे शिक्षकही नगरपंचायतीला जोडले जातील. निवडणूक विभागाने सूचना दिल्यानंतर नगरपंचायतीच्या निवडणुका घेतल्या जातील. तोपर्यंत या ठिकाणी प्रशासक काम पाहणार आहे. तहसीलदारांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.- नरेंद्र फुलझेले, निवडणूक निर्णय अधिकारी, यवतमाळ