जन धन योजनेचा प्रारंभ

By Admin | Updated: September 8, 2014 01:52 IST2014-09-08T01:52:28+5:302014-09-08T01:52:28+5:30

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जन-धन योजनेचा स्टेट बँकेने पिसगाव व पांढरकवडा येथे शिबिर घेऊन अर्जदारांचे खाते काढून प्रारंभ केला.

Start of Jan Dhan Yojana | जन धन योजनेचा प्रारंभ

जन धन योजनेचा प्रारंभ

मारेगाव : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जन-धन योजनेचा स्टेट बँकेने पिसगाव व पांढरकवडा येथे शिबिर घेऊन अर्जदारांचे खाते काढून प्रारंभ केला.
येथील स्टेट बँक शाखेतर्फे तालुक्यातील पिसगाव व पांढरकवडा येथे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ज्या ग्रामस्थांचे अद्याप बँकेत खाते नाही, अशांना बँकेशी जोडण्यासाठी जन-धन योजना सुरू करण्यात आली. राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडलेल्या न्ग्रामस्थांना यापुढे केंद्राच्या विविध योजनांचा थेट लाभ मिळणार आहे़ शासनातर्फे खातेदारांचे सहा महिन्यांचे बँक व्यवहार बघून त्यांना पाच हजार रूपयांचा ओव्हर ड्राप देण्यात येणार आहे़
या योजनेअंतर्गत खातेदारांना ओव्हर ड्राप मिळणार असल्याने बँक खाते उघडण्याबाबत ग्रामस्थांमध्ये उत्साह आहे़ झिरो बॅलेन्सवर ही खाती स्टेट बँकेतर्फे उघडली जात आहे़ एकाच दिवशी पांढरकवडा येथे ७८, तर पिसगाव येथे ६३ खाते उघडण्यात आले़ जन-धन योजना राबविण्यासाठी बँकेचे शाखा व्यवस्थापक आरक़े़श्रीनिवासन, किरण जांभुळे, सतीश मोहडे, मधुकर गुजर, प्रमोद जांभूळे आदी परिश्रम घेत आहे़ (शहर प्रतिनिधी)

Web Title: Start of Jan Dhan Yojana