शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

तीन कोटींच्या मुद्रांक शुल्क अपहारावर शिक्कामोर्तब

By admin | Updated: September 17, 2014 00:02 IST

येथील पंचायत समितीत उघडकीस आलेल्या मुद्रांक घोटाळ्यावर चौकशी अधिकाऱ्याने शिक्कामोर्तब केले असून हा घोटाळा तीन कोटी २३ लाख ५७ हजार रुपयांचा असल्याचे पुढे आले आहे.

यवतमाळ : येथील पंचायत समितीत उघडकीस आलेल्या मुद्रांक घोटाळ्यावर चौकशी अधिकाऱ्याने शिक्कामोर्तब केले असून हा घोटाळा तीन कोटी २३ लाख ५७ हजार रुपयांचा असल्याचे पुढे आले आहे. विशेष म्हणजे चौकशी समितीला या प्रकरणातील अनेक वर्षाचे दस्ताऐवजच उपलब्ध झाले नाही. त्यामुळे अपहाराची रक्कम या पेक्षाही मोठी असण्याची शक्यता आहे. यवतमाळ पंचायत समितीत येत असलेल्या १५ ग्रामपंचायतींचा मुद्रांक शुल्काचा मनमानीपणे वापर ग्रामपंचायतस्तरावर झाला. यासाठी पंचायत विस्तार अधिकाऱ्यांसह ग्रामसेवकांचे साखळीच असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. हा निधी कसा खर्च झाला याचा कुठलाही लेखाजोगा ग्रामपंचायतीजवळ उपलब्ध नाही. यवतमाळ ग्रामीण, वडगाव रोड, लोहारा, मोहा, भोसा, वाघापूर, पिंपळगाव, मांगुळ, उमरसरा, कोळंबी, गोधणी, किन्ही, डोर्ली, मडकोना, भोयर या १५ ग्रामपंचायतींमध्ये २००९-२०१०, २०१०-११, २०११-१२ या तीन वर्षात मिळालेल्या तीन कोटी २३ लाख ५७ हजार ८८४ रुपयांच्या मुद्रांक शुल्काचा हिशेबच नाही. बहुतांश ग्रामसेवकांनी ही रक्कम मुरूमावर खर्च केल्याचे दाखविले. पंचायत समितीकडून ग्रामपंचायतीला प्राप्त झालेला मुद्रांक शुल्क आणि खर्च याचा कुठेही ताळमेळ नाही. विशेष म्हणजे ज्या ग्रामपंचायतीमध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार झाले त्या ग्रामपंचायतींना डावलून पंचायत समिती स्तरावरून सोयीच्या ठिकाणी मुद्रांक शुल्काची रक्कम नियमबाह्य खर्च केली आहे. तक्रारकर्त्याने पाच वर्षात जवळपास आठ कोटींचा मुद्रांक शुल्क दडपण्यात आल्याचे नमूद केले होते. प्रत्यक्षात मात्र केवळ तीनच वर्षांची चौकशी करण्यात आली. २०१२-१३ आणि २००८-०९ या आर्थिक वर्षात मुद्रांक शुल्काचे काय झाले हे अजूनही अनुत्तरित आहे. २००८-०९ मध्ये ७० लाख ९८ हजार ३०२ रुपयांचा अपहार झाला आहे. तर २०१२-१३ मध्ये एक कोटी ५४ लाख ४५ हजार ११२ रुपयांचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही. या निधीचे काय झाले याची चौकशीच झालेली नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात अपहार होवूनही जिल्हा परिषद प्रशासनाने याची फारशी गांभीर्याने दखल घेतली नाही. प्रत्यक्षात मात्र समितीचे गठन करून प्रत्येक ग्रामपंचायतीचा वर्षनिहाय लेखाजोखा तपासणे आवश्यक आहे. मात्र याची तसदी वरिष्ठांकडून घेण्यात आली नाही. (कार्यालय प्रतिनिधी)