शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

एसटीने कर्मचाऱ्यांना दिला सव्वा कोटीचा वाढीव पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 05:00 IST

परिवहन महामंडळाचे कर्मचारी महिनाभरापासून संपावर आहेत. या काळात सुरुवातीचे काही दिवस सर्व कर्मचारी कामावर होते. साधारणत: २६०० कर्मचारी या काळात आपल्या विविध आस्थापनांमध्ये सेवा देत होते. त्यानुसार ७ तारखेला एक कोटी २० लाख रुपयांचे वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले.  काम केलेल्या दिवसाचाच पगार परिवहन महामंडळाने काढला आहे. यामुळे इतर दिवशी काम नाही, तर दामही नाही या नियमानुसार वेतन अदा झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : परिवहन महामंडळाचे कर्मचारी महिनाभरापासून संपावर आहेत. या काळात सुरुवातीचे काही दिवस सर्व कर्मचारी कामावर होते. साधारणत: २६०० कर्मचारी या काळात आपल्या विविध आस्थापनांमध्ये सेवा देत होते. त्यानुसार ७ तारखेला एक कोटी २० लाख रुपयांचे वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले.  काम केलेल्या दिवसाचाच पगार परिवहन महामंडळाने काढला आहे. यामुळे इतर दिवशी काम नाही, तर दामही नाही या नियमानुसार वेतन अदा झाले आहे.

२० बसेस धावू लागल्यामहिनाभराच्या संपानंतर २० बसेस मंगळवारी धावल्या. त्यामध्ये वणी सात, पांढरकवडा सहा, यवतमाळ तीन याशिवाय नेर, पुसद, दिग्रस आणि उमरखेड येथेही बस धावली.

३०१ कर्मचाऱ्यांवर कारवाई- न्यायालयाच्या आदेशाचे आणि परिवहनमंत्र्यांच्या सूचनांचे उल्लंघन केल्यामुळे परिवहन महामंडळाने नऊ आगारातील ३०१ कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. कारवाईची मोहीम सुरूच आहे. सेवा समाप्ती आणि कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

 ५१ जणांच्या बदल्या

- आदेशाची अवहेलना करणारे आणि आंदोलन चिघळविणारे   कर्मचारी परिवहन महामंडळाने बदली करून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित केले. यामध्ये नऊ आगारांमधून ५१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

७ तारखेला झाला २६०० जणांचा पगार९ नोव्हेंबरपर्यंत कामावर असलेल्या २६०० कर्मचाऱ्यांचे वेतन परिवहन महामंडळाने अदा केले आहे. काही कर्मचाऱ्यांना उपस्थितीनुसार केवळ दोन दिवसांचा पगार अदा करण्यात आला आहे.

काम असेल तरच दामपरिवहन महामंडळाने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. मग तो कर्मचारी एक दिवसही कामावर असला तरी त्याचे वेतन या महिन्यात अदा करण्यात आले आहे. यानुसार सर्वच कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले.- श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप