शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
6
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
7
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
8
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
9
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
10
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
11
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
12
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
13
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
14
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
15
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
16
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
17
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
18
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
19
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
20
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
Daily Top 2Weekly Top 5

एसटी पासचा घोळ संपता संपेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 06:00 IST

तारखेशिवाय देण्यात येणाऱ्या पासचा वापर अमर्याद केला जाऊ शकतो. विद्यार्थ्यांना तीन महिन्यांची पास देण्यात येते. त्यानंतर नूतनीकरण करून घ्यावे लागते. तारीख नसलेले पासधारक यासाठी कुठलेही लोड घेत नाही. एकदा पास हाती पडली की अमर्याद कालावधीपर्यंत वापरायची असाच प्रकार सुरू आहे.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांची दिरंगाई : महामंडळाला आर्थिक फटका, कालमर्यादा नसलेल्या पासचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात प्रवास सवलत पासमध्ये प्रचंड घोळ सुरू आहे. बोगस स्वाक्षरी, तारीख नसलेल्या, शहरातून खेड्याकडे जाण्यासाठीच्या पास प्रवाशांकडे सापडत आहे. अधिकाऱ्यांचे सुटलेले नियंत्रण आणि कर्मचाऱ्यांची कामातील दिरंगाई या प्रकारामुळे महामंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे.बोगस पासची अनेक प्रकरणे विभागात पुढे आलेली आहे. काही लोकांवर कारवाई झाली आहे. कार्डवर असलेली आणि संबंधित अधिकाऱ्याची प्रत्यक्षात असलेली स्वाक्षरी यात बराच फरक आहे. या बाबी स्पष्टपणे पुढे आलेल्या आहे. तरीही कुणावरही कारवाई केली जात नाही. याच प्रकारामुळे कर्मचाऱ्यांचीही कामातील दिरंगाई वाढत चालली आहे. चक्क तारीख नसलेल्या पासेस वाटल्या जात आहे.तारखेशिवाय देण्यात येणाऱ्या पासचा वापर अमर्याद केला जाऊ शकतो. विद्यार्थ्यांना तीन महिन्यांची पास देण्यात येते. त्यानंतर नूतनीकरण करून घ्यावे लागते. तारीख नसलेले पासधारक यासाठी कुठलेही लोड घेत नाही. एकदा पास हाती पडली की अमर्याद कालावधीपर्यंत वापरायची असाच प्रकार सुरू आहे. अपवादानेच वाहक याविषयी चौकशी करतात. मात्र या सर्व प्रकारात महामंडळाचे नुकसान होत आहे.महामंडळाच्या बसमध्ये दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या प्रवास सवलतीचा पैसा शासनाकडून मिळतो. परंतु पासची योग्य नोंद होत नसल्याने काही बाबतीत या महसुलाला महामंडळाला मुकावे लागते. बोगस पासची नोंदणी कुठेच सापडत नाही. अशाच पासच्या भरवशावर प्रवास केला जातो. पैसा मात्र महामंडळाला मिळत नाही. या सर्व बाबींविषयी महामंडळाच्या सर्वांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.

टॅग्स :state transportएसटी