शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाने टाकला बदलीचा ‘गीअर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2021 05:00 IST

विशेष म्हणजे, हे कर्मचारी सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणापासून प्रवासाला किमान दोन ते तीन तास लागतील एवढ्या अंतरावर त्यांची बदली करण्यात आली आहे. शिवाय, ५७ जणांना आपणास बडतर्फ का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीला घेऊन कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपाचा शनिवारी ३५ वा दिवस उजाडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम असतानाच एसटी महामंडळाने ते कामावर यावेत यासाठी नवनवीन प्रयोग सुरू केले आहेत. शनिवारी अचानक संपावरील कर्मचाऱ्यांच्या बदलींचे आदेश काढण्यात आले आहेत. यवतमाळ विभागातील ५१ जणांना हा आदेश देऊन लगेच कामावर हजर होण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, हे कर्मचारी सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणापासून प्रवासाला किमान दोन ते तीन तास लागतील एवढ्या अंतरावर त्यांची बदली करण्यात आली आहे. शिवाय, ५७ जणांना आपणास बडतर्फ का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावण्यात आली आहे.एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीला घेऊन कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपाचा शनिवारी ३५ वा दिवस उजाडला आहे. या काळात महामंडळाने केलेल्या विविध प्रयत्नानंतरही बहुतांश कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत. आतापर्यंत यवतमाळ विभागातील ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, तर ३५ हून अधिक कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले गेले.संपावरील कर्मचाऱ्यांवर या कारवाईचा कुठलाही फरक होत नसल्याचे पाहून महामंडळाने शनिवारी अचानक कर्मचाऱ्यांचे बदली आदेश काढले. यवतमाळ विभागातील ४६ चालक, वाहकांची, तर चार सहायक आणि एका बॉडी फिटरची बदली केली आहे. गुरुवारी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विभाग नियंत्रकांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. यामध्ये करण्यात आलेल्या सूचनांच्या आधारे कर्मचाऱ्यांचे बदली सत्र राबविण्यात आले. दिग्रस, वणी, दारव्हा, उमरखेड, राळेगाव, नेर, पुसद, यवतमाळ आगारातील प्रत्येकी पाच, पांढरकवडा आगारातील सहा, तर विभागीय कार्यशाळेतील पाच कर्मचाऱ्यांची बदली विभाग नियंत्रकांच्या आदेशाने करण्यात आली आहे. महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा हा कालावधी नाही. साधारणत: विनंती बदल्या या काळात केल्या जातात. मार्च किंवा जूनमध्ये सार्वत्रिक बदल्या होतात. शुक्रवारी काढण्यात आलेले बदली आदेश कर्मचारी कामावर यावेत यादृष्टीनेच काढले असल्याचे सांगितले जात आहे.

शनिवारी दिग्रसमधून अवघी एक बसफेरी - शनिवारी दिग्रस आगारातील दोन कर्मचारी कामावर हजर झाले. त्यांच्या माध्यमातून एक बस मार्गावर सोडण्यात आली. दिग्रस-दारव्हा-यवतमाळ असा या बसचा मार्ग होता. या बसफेरीला बऱ्यापैकी प्रवासी मिळाल्याचे सांगितले जाते.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप