आठवीच्या अर्थने विकसित केला फवारणी रोबोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 05:00 AM2020-02-25T05:00:00+5:302020-02-25T05:00:17+5:30

पिकांवर कीटकनाशक फवारताना शेतकरी, शेतमजुरांना संकटाला तोंड द्यावे लागते. अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. काहींची दृष्टी गेली. या बिकट प्रश्नावर उपाय शोधण्याच्या विचाराने प्रेरित होऊन अर्थने हा रोबोट तयार केला आहे.

Spray robot developed in the sense of the eighth | आठवीच्या अर्थने विकसित केला फवारणी रोबोट

आठवीच्या अर्थने विकसित केला फवारणी रोबोट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील स्कूल ऑफ स्कॉलर्सचा आठवीचा विद्यार्थी अर्थ विवेक जगताप याने स्वयंचलित फवारणी रोबोट विकसित केला आहे. मोबाईलने कार्यान्वित होत असलेला हा रोबोट त्याने अत्याधुनिक तंत्राचा वापर करून तयार केला आहे.
पिकांवर कीटकनाशक फवारताना शेतकरी, शेतमजुरांना संकटाला तोंड द्यावे लागते. अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. काहींची दृष्टी गेली. या बिकट प्रश्नावर उपाय शोधण्याच्या विचाराने प्रेरित होऊन अर्थने हा रोबोट तयार केला आहे.
रोबोट शेतातील पिके स्वत:च लक्षात घेतो व तेव्हाच फवारणी करतो. शेतातील तापमान, जमिनीतील आर्द्रता पटलावर दाखवितो. या रोबोटचे अनेक ठिकाणच्या विज्ञान प्रदर्शनात कौतुक झाले आहे. नागपूर येथे झालेल्या सीबीएसई विज्ञान प्रदर्शनातही अर्थचा रोबोट कौतुकास पात्र ठरला आहे.

Web Title: Spray robot developed in the sense of the eighth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.