पांढरकवडात जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 05:00 AM2020-07-15T05:00:00+5:302020-07-15T05:00:07+5:30

पांढरकवडा येथे कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने कडकपणे लॉकडाऊन करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी शहरवासीयांची मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक व्यापारी संघटनेने १४ ते १६ जुलैपर्यंत जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. यामध्ये सर्व किराणा दुकान, फळ, भाजी, दूध, कापड, स्टेशनरी, हार्डवेअर व इतर सर्व किरकोळ दुकाने बंद ठेवण्याची विनंती केली होती.

Spontaneous response to the public curfew in Pandharkavada | पांढरकवडात जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद

पांढरकवडात जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद

googlenewsNext
ठळक मुद्देव्यापाऱ्यांनी पाळला कडकडीत बंद : कोरोनाच्या शिरकावाने नागरिकांत भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : स्थानिक व्यापारी संघटनेने केलेल्या तीन दिवसाच्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला मंगळवारी पहिल्या दिवशी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. काही कृषी सेवा केंद्र व औषधी दुकाने वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठाणे १०० टक्के बंद होती.
पांढरकवडा येथे कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने कडकपणे लॉकडाऊन करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी शहरवासीयांची मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक व्यापारी संघटनेने १४ ते १६ जुलैपर्यंत जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. यामध्ये सर्व किराणा दुकान, फळ, भाजी, दूध, कापड, स्टेशनरी, हार्डवेअर व इतर सर्व किरकोळ दुकाने बंद ठेवण्याची विनंती केली होती. व्यापारी संघटनेच्या या विनंतीला प्रतिसाद देत आज पहिल्या दिवशीही सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत होता. काही टवाळखोर युवक मात्र दुचाकीवर डबलसिट फिरताना दिसत होती. बुधवार व गुरूवारीदेखिल सर्वच व्यापाऱ्यांनी किरकोळ दुकानदारांनी असेच सहकार्य करावे, असे आवाहन व्यापारी संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.
 

Web Title: Spontaneous response to the public curfew in Pandharkavada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.