शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानक विकासासाठी विशेष निधी

By admin | Updated: January 18, 2015 22:50 IST

यवतमाळ बसस्थानकावरून दरदिवशी हजारो नागरीक ये-जा करीत असतात. परंतु त्या तुलनेत पाहिजे त्या सुविधा तेथे उपलब्ध नाही. बसस्थानकाबाबत वारंवार तक्रारीही होत असून त्

यवतमाळ : यवतमाळ बसस्थानकावरून दरदिवशी हजारो नागरीक ये-जा करीत असतात. परंतु त्या तुलनेत पाहिजे त्या सुविधा तेथे उपलब्ध नाही. बसस्थानकाबाबत वारंवार तक्रारीही होत असून त्यानुषंगाने बसस्थानक विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यासोबतच यवतमाळ हे जिल्ह्यातील एक आदर्श बसस्थानक बनविणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.पालकमंत्री राठोड यांनी अगदी सकाळी यवतमाळ बसस्थनकाला भेट देऊन पाहणी केली तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत अडीअडचणींसदर्भात चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार मदन येरावार, परिवहन महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक पठारे, विभाग नियंत्रक लोखंडे, आगार प्रमुख दीपक इंगळे, विभागीय अभियंता के.आर. बिजवे यांच्यासह सामाजिक संस्थेचे अजय मुंधडा, उद्योजक राजेश्वर निवल, मनोज औदार्य आदी उपस्थित होते. यवतमाळ बसस्थानकाचा परिसर अस्वच्छ राहत असल्याच्या तक्रारी आहे. यापुढे अस्वच्छता दिसता कामा नये. संबंधित कंत्राटदार सफाईचे काम व्यवस्थित करीत नसेल तर त्यास समज देऊन दिलेली रक्कम दंडासह वसूल करा. परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी आठवड्याभरात कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. बसस्थानकावर खड्डे मोठ्या प्रमाणावर आहेत. स्वच्छतेचे काम नीट होत नाही त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासोबतच यवतमाळ बसस्थानक एक आदर्श बसस्थानक म्हणून नावारूपास येण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यासाठीही प्रस्ताव त्वरित करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. बसस्थानक भर वस्तीत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. त्यासाठी तात्पुरता पर्याय म्हणून एसटी बस आत जाणारे गेट पांढरकवडा रोड कडील बाजूस हलविणार असल्याचे सांगून त्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याबाबत त्यांनी सुचविले. यामुळे बसस्थानक चौकातील गर्दी कमी होणार आहे. पुढे सदर बसस्थानक आर्णी रोडवरील कार्यशाळेच्या जागेवर व कार्यशाळा एमआयडीसीत हलविण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)