शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नेर तालुक्यात विशेष घटक योजनेचा फज्जा

By admin | Updated: September 6, 2014 02:24 IST

मागावर्गीय घटकांकरिता नेर तालुक्यात विशेष घटक योजना राबविण्यात आली. या योजनेत बोगस लाभार्थ्यांचा मोठ्याप्रमाणात भरणा असून, ...

सोनखास : मागावर्गीय घटकांकरिता नेर तालुक्यात विशेष घटक योजना राबविण्यात आली. या योजनेत बोगस लाभार्थ्यांचा मोठ्याप्रमाणात भरणा असून, पात्र आणि ज्ञान नसलेल्या खऱ्या लाभार्थ्यांना मात्र या योजनेतून डावलण्यात आले आहे. त्यासाठी ग्रामसेवकांपासून तर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच मोठ्याप्रमाणात हेरफेर केली असल्याचे सांगण्यात येते. जीवनमान उंचावण्यासाठी मागासवर्गीय घटकांसाठी शासनाच्या कृषी विभागाकडून विशेष घटक योजनेंतर्गत बैलजोडी आणि बंडी देण्यात येते. ग्रामीण भागाप्रमाणेच तालुक्यातही ही योजना राबविल्या गेली. मात्र चिरीमीरी घेतल्याशिवाय या योजनेचा लाभच मिळत नाही, अशी ओरड आता लाभार्थ्यांकडून होत आहे. या योजनेतील लाभार्थ्यांची यादी तयार करताना ग्रामसेवक, तलाठी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांची भुमिका महत्वाची होती. त्यातूनच या यादीत मोठ्याप्रमाणात घोळ झाला. पात्र लाभार्थ्यांपेक्षा बोगस लाभार्थ्यांचाच त्यामध्ये भरना आहे. लाभार्थी निवडीचे निकष असताना वैयक्तिक स्वार्थापोटी लाभार्थी निवडल्या गेल्याने या योजनेचा तालुक्यात पुरता बोजवारा उडाला आहे. सोनखास येथील अंबादास जागोजी लडके या लाभार्थ्याने दोनदा बैलजोडी आणि बंडीसाठी आर्थिक सहकार्य मिळावे म्हणून प्रशासनाकडे अर्ज केले. मात्र एकदाही त्यांचा अर्ज विचारात घेतला गेला नाही. याउलट सधन आणि बोगस लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ तत्काळ मिळाला. शिवाय अनेक लाभार्थ्यांना आजवर योजनेतून बैलजोडी देण्यात आली, परंतु बंडीचा अद्याप थांगपत्ता नाही. अनेक लाभार्थी योजनेचा लाभ मिळावा म्हणून शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवताना दिसतात. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी ही योजना शासनाने राबविली. मात्र लालफितशाहीने या योजनेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. (वार्ताहर)