शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

दारू-जुगार व्यावसायिकांच्या शुभचिंतकांवर एसपींचा ‘वॉच’

By admin | Updated: May 24, 2015 00:17 IST

जिल्ह्यातील दारू-जुगार व अन्य अवैध व्यावसायिकांच्या खाकी वर्दीतील शुभचिंतकांवर आता नवनियुक्त जिल्हा पोलीस ....

‘लोकमत’ वृत्ताची दखल : भानगडी नको, सांभाळून राहण्याचा ठाणेदारांना सल्ला यवतमाळ : जिल्ह्यातील दारू-जुगार व अन्य अवैध व्यावसायिकांच्या खाकी वर्दीतील शुभचिंतकांवर आता नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांचा वॉच राहणार आहे. ‘नवे साहेब आले हो, धंदे बंद करा!’ असा संदेश पोहोचवून अवैध व्यावसायिकांना अलर्ट केले गेले होते. ‘लोकमत’ने शनिवारच्या अंकात या संबंधीचे सविस्तर वृत्त छायाचित्रानिशी प्रकाशित केले. या वृत्ताची एसपी सिंह यांनी दखल घेतली. कार्यालयात येताच त्यांनी ‘लोकमत’मधील वृत्ताचे कात्रण बोलावून त्यावर लक्ष केंद्रीत केले. मावळत्या काळात चालणारा शिरपूर पॅटर्नही त्यांनी समजावून घेतला. तत्पूर्वी शुक्रवारी सायंकाळी पोलीस मुख्यालयात संजय दराडे यांना निरोप आणि सिंह यांच्या स्वागताचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची छोटेखानी बैठक घेतली. त्यांच्याकडून समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कुणाकडे किती कर्मचारी आहेत, किती कमी आहेत, घरे, वेतन, भत्ते याच्या समस्या व अन्य अडीअडचणी काय यावर चर्चा केली. सोबतच ‘बाकी भानगडी आपल्याला चालणार नाहीत, सांभाळून रहा’ अशा शब्दात आपली भूमिकाही स्पष्ट केली. अवैध धंदे कोणत्याही परिस्थितीत चालणार नाही असे सांगताना कारवाईचे संकेत दिले गेल्याने अवैध धंद्यांना खतपाणी घालणारे पोलीस अधिकारी-कर्मचारी धास्तावले आहे. एसपींची ही भूमिका आणखी सविस्तर स्पष्ट होण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना क्राईम मिटींगची प्रतीक्षा असल्याचे सांगितले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)