शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

१७ दिवसांपासून बेपत्ता पेंटरचा सांगाडाच सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 05:01 IST

निखिलचा मोबाईल त्याच्या घरातच सापडला. त्यावर ‘मी कर्जाचा कंटाळून मरणाचा मार्ग स्वीकारत आहे’ असा संदेश आढळून आला. २३ ऑगस्ट रोजी निखिलचे शेजारी भाऊ राठोड यांनी चिंतामणी मंदिरासमोरील टेकडीवर वडसद जंगलात कोणी तरी मरून पडले असल्याची माहिती पंकज खाडे याला दिली. त्यावरून ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाची ओळख पटविली.

ठळक मुद्देपुसद ग्रामीण : आत्महत्या की घातपात ?

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : पेंटींगचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या तरुणाचा सांगाडा कारला रोडवरील चिंतामणी मंदिराच्या टेकडीवर मंगळवारी आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा तरुण गेल्या १७ दिवसांपासून बेपत्ता होता.निखिल बळीराम खाडे (२७) रा. महात्मा फुले सोसायटी कवडीपूर ता. पुसद असे मृत तरुणाचे नाव आहे. निखील ६ ऑगस्ट रोजी काहीही न सांगता घरुन निघून गेला होता. कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध करूनही त्याचा थांगपत्ता लागला नाही. त्याचा मोठा भाऊ पंकज याने ७ ऑगस्ट रोजी निखिल हरविल्याची तक्रार ग्रामीण पोलिसात दाखल केली होती.दरम्यान निखिलचा मोबाईल त्याच्या घरातच सापडला. त्यावर ‘मी कर्जाचा कंटाळून मरणाचा मार्ग स्वीकारत आहे’ असा संदेश आढळून आला. २३ ऑगस्ट रोजी निखिलचे शेजारी भाऊ राठोड यांनी चिंतामणी मंदिरासमोरील टेकडीवर वडसद जंगलात कोणी तरी मरून पडले असल्याची माहिती पंकज खाडे याला दिली. त्यावरून ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाची ओळख पटविली.यावेळी निखिलच्या मृतदेहाचे संपूर्ण मांस जनावरांनी खाल्ल्याचे दिसून आले. केवळ सांगाडा उरला होता व सांगाड्यावर पॅन्ट, शर्ट आणि गळ्यात दोरी अडकवलेली आढळून आली. पंकज खाडे याच्या तक्रारीवरून पुसद ग्रामीण पोलिसांनी तूर्तास अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पुसद उपजिल्हा रुग्णालयात आणला.निखिलला आई-वडील नसून तो भाऊ व बहीण यांच्यासोबत राहत होता. ग्रामीणचे ठाणेदार संजय चौबे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय भाऊ वंजारे तपास करीत आहे.

टॅग्स :Deathमृत्यू