शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
3
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
4
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
5
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
6
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
7
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
8
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
9
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
10
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
11
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
12
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
13
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
14
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
15
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
16
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
17
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
18
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
19
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
20
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रस शहरात सहा दिवसांआड मिळते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST

शहराला नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे पाणी पुरविले जाते. यात महिन्यातून केवळ पाच दिवसच पाणीपुरवठा होतो. सहा दिवसांआड नळ येतात. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महिन्यातील पाच दिवसांच्या पाण्यासाठी पालिकेकडून १७० रुपये पाणी कर वसूल केला जातो.

ठळक मुद्देदुष्काळाचे सावट : नांदगव्हाण धरणाचे पुनर्निर्माण थंडावले, पालिकेची अनास्था

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : शहराला सध्या सहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. उन्हाळ्यात ही स्थिती भयावह होण्याची शक्यता आहे. परिणामी शहरावर दुष्काळाचे सावट घोंगावत आहे.शहराला नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे पाणी पुरविले जाते. यात महिन्यातून केवळ पाच दिवसच पाणीपुरवठा होतो. सहा दिवसांआड नळ येतात. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महिन्यातील पाच दिवसांच्या पाण्यासाठी पालिकेकडून १७० रुपये पाणी कर वसूल केला जातो. मात्र नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी पुरविण्यास पालिका अपयशी ठरत आहे. नगराध्यक्षांसह नगरसेवक उपाययोजना करीत नसल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.यावर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शहरातील धावंडा नदीला एकही पूर गेला नाही. परिणामी शहर व तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. मात्र नगरपरिषदेच्या मालकी हक्काचे असलेल्या नांदगव्हाण धरणाची पुनर्बांधणी रखडली आहे. गेल्या १४ वर्षांपासून धरणाची पुनर्बांधणी सुरूच आहे. अद्यापही काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे शहरवासीयांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. उन्हाळ्यात तर दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.नगरपरिषदेकडून गेल्या १४ वर्षांपासून नांदगव्हाण धरण पुनर्बांधणी सुरू असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे पालिकेच्या हलगर्जीपणानेच १४ वर्षांपूर्वी हे धरणे फुटले होते, असा जनतेचा आरोप आहे. ९ जुलै २००५ रोजी धरण फुटल्याने होत्याचे नव्हते झाले होते. महापुरात १२ निष्पाप बळी गेले होते. तेव्हापासून पुनर्बांधणी रखडली आहे. ‘सायफन’ पद्धतीचे हे धरण विना विजेने नगरपरिषदेच्या पाण्याच्या टाकीत पाणी पोहोचवत होते. आता धरणताच नाही, तर टाकीत पाणी कुठून येणार, असा प्रश्न आहे.धरणातील गौण खनिजाची चोरीनांदगव्हाण धरणातील गौण खनिज भर दिवसा चोरीस जात आहे. पुर्नबांधणीकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने चोरटे निर्धास्त झाले आहे. १२ कोटींचा निधी मिळूनही अद्याप काम पूर्ण झाले नाही. परिणामी धरणातून लाखो लीटर पाणी नाहक वाहून जात आहे. पुनर्बांधणीला आणखी किती वर्षे लागतील, असा प्रश्न जनतेला पडला आहे. शहरातील कृत्रिम पाणीटंचाई दूर करण्यासाठी आमदार संजय राठोड यांनी लक्ष देण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

टॅग्स :Waterपाणी