शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

सीताफळांची आवक वाढली, भाव मात्र वधारले

By admin | Updated: October 24, 2016 01:09 IST

आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऐन थंडीच्या दिवसात येणारी सीताफळे बाजारात दाखल झाली आहेत.

पावसामुळे यंदा चांगला बहर : माळरानावर नैसर्गिकपणे लगडलेल्या फळांची गोडीच न्यारीपुसद : आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऐन थंडीच्या दिवसात येणारी सीताफळे बाजारात दाखल झाली आहेत. दमदार पावसामुळे यंदा सीताफळाच्या झाडांना चांगलाच बहर आला आहे. पुसदच्या बाजारात चांगल्या प्रतीचे सीताफळ चाळीस ते पन्नास रुपये किलोने विकले जात असून सर्वच स्तरातील लोकांमध्ये आवडीचा असलेला हा रानमेवा महागला आहे.पुसद परिसरात डोंगराळ माळरानावर सीताफळाची झाडे मोठ्या प्रमाणात असून इतरही डोंगराळ भागात तुरळक प्रमाणात झाडे आहेत. शेतकरी दरवर्षी विक्रीसाठी बाजारात सीताफळे आणतात. त्यातून अनेकांना चांगले उत्पन्न मिळते. पुसद तालुक्यात सीताफळाचे आवर्जुन उत्पन्न घेणारे शेतकरी कमीच आहे. परंतु तालुक्यातील डोंगराळ भागात सीताफळाची अगणित झाडे आहेत. मागील तीन वर्षाच्या दुष्काळामुळे झाडांच्या संख्येत घट झाली आहे. परंतु यंदा सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून झालेल्या १५ दिवसाच्या मुसळधार पावसामुळे डोंगरातील सीताफळांची झाडेही मोहरली आहेत. यंदा डोगरातील झाडांना मोठ्या प्रमाणात फळे लगडली आहेत. शेतजमिनीमध्ये उत्पादित केलेल्या सीताफळापेक्षा माळरानावर नैसर्गिकरीत्या लगडलेल्या सीताफळांची गोडीच न्यारी आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ डोंगरातील सीताफळांची चव चाखण्यासाठी आतुर असतात. मेंढपाळ, पशुपालक दोन महिने ताजी सीताफळे खाण्याचा आनंद घेतात. आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सीताफळे परिपक्व होतात. पिकण्याअगोदर काढलेली फळे साधारण चार दिवसात पिकतात. मशागतीशिवाय फळे हातात येत असल्याने उत्पादकांना आणि मजुरांनाही त्याची किंमत वाटत नाही. महिला, शाळकरी मुले सीताफळे तोडून विक्रीस आणतात. त्यांना यातून ४०० ते ५०० रुपये प्रतिदिन रोजगार मिळत आहे. या फळाच्या वाढीपासून ते पिकविण्यापर्यंत कोणत्याही रासायनिक प्रक्रियेचा अवलंब सध्या तरी होत नसल्याने सीताफळाची आवर्जून खरेदी होत असते. शिक्षणासाठी अथवा नोकरीसाठी परगावी असलेली मंडळी दिवाळीच्या निमित्ताने घरी परतल्यामुळे घाऊक प्रमाणात सीताफळाची खरेदी करून त्याचा सामूहिक आस्वाद घेतला जातो. मात्र गोडी वाढण्यासोबतच सीताफळांचे भावही चांगलेच वाढले आहेत. (तालुका प्रतिनिधी)