Shocking! Ex-serviceman killed in accident at Ner | धक्कादायक! नेर येथे अपघातात माजी सैनिकाचा मृत्यू  

धक्कादायक! नेर येथे अपघातात माजी सैनिकाचा मृत्यू  

ठळक मुद्दे किशोर भाऊराव जगताप (४७) रा. नेर असे मृताचे नाव आहे.

नेर (यवतमाळ) : दुचाकी अपघातात माजी सैनिक ठार झाला. ही घटना बुधवारी सकाळी ५.३० वाजता बाभूळगाव मार्गावर घडली. किशोर भाऊराव जगताप (४७) रा. नेर असे मृताचे नाव आहे.


किशोर जगताप हे सध्या भारतीय स्टेट बॅंकेच्या दारव्हा शाखेत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. सकाळी बाभूळगाव रोडवर असलेल्या शेतात एमएच-२९-बीजे- ९८५८ क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. सावंगाजवळ ते मृतावस्थेत आढळले. सकाळी फिरायला गेलेल्या नागरिकांना हा प्रकार आढळून आला. अपघात नेमका कशामुळे झाला हे कळू शकले नाही. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी व मोठा आप्त परिवार आहे. ठाणेदार ज्ञानेश्वर घुगे, पोलीस कर्मचारी राजेश भगत, नरेंद्र लाहोरे, भारत पाटील यांनी पोलीस कारवाई पार पाडली.

Web Title: Shocking! Ex-serviceman killed in accident at Ner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.