यवतमाळच्या सिंधी कॅम्प परिसरात आग लागल्याने सतरा लाखाचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 23:26 IST2021-01-15T23:25:44+5:302021-01-15T23:26:07+5:30
Yavatmal News : यवतमाळ शहरातील शिवाजी मैदानाजवळील सिंधी कॅम्प परिसरात छत्तानी यांच्या घराच्या तळमजल्यावर शुक्रवारी दुपारी 2 वाजता अचानक आग लागल्याने अनेकांची तारांबळ उडाली

यवतमाळच्या सिंधी कॅम्प परिसरात आग लागल्याने सतरा लाखाचे नुकसान
यवतमाळ - शहरातील शिवाजी मैदानाजवळील सिंधी कॅम्प परिसरात छत्तानी यांच्या घराच्या तळमजल्यावर शुक्रवारी दुपारी 2 वाजता अचानक आग लागल्याने अनेकांची तारांबळ उडाली आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात येताच बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
सिंधी कॅम्प परिसरात छत्ताणी यांची तीन मजली इमारत असून त्यांच्या मुलांचे डेंटल क्लिनिक आहे.डेंटल क्लिनिक साठी लागणारी अद्ययावत मशीन नुकतीच आणली होती दोन दिवसातच क्लिनीकला नेण्यात येणार होते.मात्र या अचानक लागलेल्या आगीत जळून ती मशीन भस्मसात झाली.हा प्रकार दुपारी दोनच्या सुमारास घडला असल्याने घराबाहेर कोणी नव्हते त्यामुळे जीवितहानी टाळली असल्याचे छत्ताणी यांनी सांगितले.
हा प्रकार छत्तानी यांना समजताच त्यांनी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणली असून ही आग कोणीतरी लावली असावी असा संशय घरमालक यांनी व्यक्त केला आहे.तसेच या आगीत जवळपास पंधरा ते सतरा लाखाचे नुकसान झाल्याचे छत्ताणी यांनी सांगितले .