शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

सात लाखांचा गुटखा जप्त

By admin | Updated: October 21, 2015 02:44 IST

विदर्भातून मराठवाड्यात जाणारा तब्बल सात लाख रुपयांचा गुटखा उमरखेड पोलिसांनी हरदडा फाट्यावर केलेल्या कारवाईत जप्त केला.

दोघांना अटक : उमरखेडची कारवाई, पुन्हा कारंजा ‘कनेक्शन’ उघडउमरखेड : विदर्भातून मराठवाड्यात जाणारा तब्बल सात लाख रुपयांचा गुटखा उमरखेड पोलिसांनी हरदडा फाट्यावर केलेल्या कारवाईत जप्त केला. ही कारवाई मंगळवारी सकाळी ६ वाजता करण्यात आली. या प्रकरणी दोन जणांना अटक केली असून बोलेरो जीपही जप्त करण्यात आली आहे. कारंजाचा गुटखाकिंग ‘जावेद’कडून मोठ्या प्रमाणात गुटखा मराठवाड्यात जात असल्याची गुप्त माहिती उमरखेड पोलिसांना मिळाली. त्यावरून मंगळवारी सकाळी ठाणेदार शिवाजी बचाटे यांनी आपल्या पथकासह सकाळी ६ वाजता हरदडा फाट्यावर सापळा रचला. साध्या वेशातील पोलीस उपनिरीक्षक मनोज मानकर, पोलीस शिपाई राजेश घोगरे, मोहन चाटे त्या ठिकाणी उपस्थित होते. प्रत्येक वाहनांची तपासणी सुरू होती. ही शोध मोहीम सुरू असताना बोलेरो पिकअप वाहन एम.एच.२९-टी-६२७९ हरदडा फाट्यावर थांबली. चालकाला हिमायतनगरचा रस्ता माहीत नसल्याने साध्या वेशातील पोलिसाला प्रवासी समजून त्याने हिमायतनगरचा रस्ता विचारला. पोलिसाने गाडीत काय आहे असे विचारले असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यावरून पोलिसांना संशय आला. वाहनाची तपासणी सुरू केली असता मोठ्या प्रमाणात गुटख्याचे पोते आढळून आले. २० पोत्यांमध्ये सात लाख रुपयांचा गुटखा ठेवून होता. या घटनेची माहिती उमरखेड ठाण्यात देण्यात आली. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग शिंदे घटनास्थळी पोहोचले. हरदडा फाट्यावरून गुटखा असलेले वाहन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आरोपी मोहंमद सोयब मोहंमद शबीर (२८) रा. बारभाई मोहोल्ला दारव्हा आणि मिर्झा अलीम बेग सरदार बेग (२४) रा. भुरेखा नगर दारव्हा या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता सदर वाहन कारंजा येथील अब्दूल सकीर अब्दूल नजीर यांचे असल्याचे पुढे आले. सदर गुटखा मराठवाड्यातील हिमायतनगर येथील अमेर गोळी भांडारचे मालक शेख अमीर यांच्याकडे दारव्हा येथून जात असल्याची कबुली दिली. या गुटख्याची किंमत सात लाख आणि वाहनाची किंमत पाच लाख असा १२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उमरखेड पोलिसांनी केलेल्या या कारवाईने गुटखा विक्रेत्यांचे धाबे चांगलेल दणाणले आहे. उमरखेड पोलिसांनी गेल्या वर्षभरात पाच वेळा गुटखा साठा जप्त केला. यातील आरोपींवर कारवाई केली. मंगळवारी पुन्हा सात लाखांचा गुटखा जप्त झाला. पोलीस गुटख्यांवर कारवाई करीत आहे. परंतु यवतमाळचा अन्न व औषधी प्रशासन विभाग मात्र कोणतीही कारवाई करीत नाही. त्यामुळे हा विभाग संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. गुटखा विक्रेते आणि या अधिकाऱ्यांचे साटेलोटे आहे. (शहर प्रतिनिधी)