शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या उपोषणाची सांगता

By admin | Updated: November 15, 2014 22:54 IST

योजना राबविण्यात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत झरगडच्या विद्यमान आणि माजी ग्राम सचिवांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने २२ आदिवासी बांधवांनी सुरू केलेल्या उपोषणाची सांगता झाली.

ग्रामसचिव निलंबित : योजना राबविण्यात दिरंगाईचा ठपकाराळेगाव : योजना राबविण्यात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत झरगडच्या विद्यमान आणि माजी ग्राम सचिवांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने २२ आदिवासी बांधवांनी सुरू केलेल्या उपोषणाची सांगता झाली. सन २००२ च्या दारिद्र्यरेषेखालील आदिवासी लाभार्थ्यांच्या घरकुलाची चौकशी व्हावी, झरगड गटग्रामपंचायतीत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी कारवाई व्हावी, १९९७-९८ मध्ये देण्यात आलेल्या आदिवासी घरकूलप्रकरण सखोल तपासण्यात यावे, ग्रामसभा न घेता मंजूर झालेल्या ठरावाची चौकशी करावी या प्रमुख मागण्यांना घेऊन झरगड येथील ग्रामस्थांनी येथे बेमुदत उपोषण सुय केले होते. देवेंद्र आत्राम यांच्या नेतृत्वात नानीबाई कुडमथे, नंदा मेश्राम, सरस्वती मेश्राम, देवकाबाई आत्राम, नामदेव आत्राम, सुरेश पंधरे, सतीश सिडाम, श्रावण पंधरे, गणेश परचाके, चरण पंधरे, सुखदेव आत्राम, वामन सिडाम, समीर मेश्राम, अजाब आत्राम, सिंधू पुसनाके, संभा पंधरे, महादेव पुसनाके, भारत मेश्राम, सित्रू पंधरे आदींनी पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केले होते. शनिवारी उपोषणाच्या पाचव्या दिवशी आमदार डॉ.अशोक उईके, अ‍ॅड.प्रफुल्ल चौहान, गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर चर्चा करून चौकशी केली. यात योजना राबविताना दिरंगाई झाल्याचे लक्षात आले. यावरून झरगडचे विद्यमान आणि माजी ग्रामसचिव आर.एम. ठावरी आणि ए.व्ही. कावलकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. शिवाय पुढील योजना राबविताना गरजूंनाच लाभ दिला जाईल, असे आश्वासन दिल्याने उपोषण सोडविण्यात आले. यावेळी प्रभाकर पाटील, नागेश्वर हिवरे, बाळासाहेब दिगडे, भाजपा तालुकाध्यक्ष अनिल जवादे यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)