शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
2
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
3
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
4
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
5
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
6
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
7
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
8
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
9
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
10
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
11
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
12
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
13
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
14
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
15
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
16
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
17
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
18
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
19
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
20
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
Daily Top 2Weekly Top 5

संवेदनशील महिलांनी उभारली ‘माणुसकीची भिंत’

By admin | Updated: December 31, 2016 01:07 IST

जुने वर्ष संपून नवे वर्ष सुरू होत आहे. याच ‘संधीकाला’चा कॅनव्हास वापरून गरिबी-श्रीमंतीचाही सांधा

नववर्षाचा हळवा उपक्रम : गोरगरिबांसाठी चापमनवाडी परिसरातील साई मंदिरात एकवटणार समाज, एक जानेवारीला उद्घाटन
यवतमाळ : जुने वर्ष संपून नवे वर्ष सुरू होत आहे. याच ‘संधीकाला’चा कॅनव्हास वापरून गरिबी-श्रीमंतीचाही सांधा जुळविण्याचा प्रयोग यवतमाळात होऊ घातला आहे. श्रीमंतांनी गरिबांसाठी स्वेच्छेने वस्तू द्याव्या आणि गरिबांनी त्यांना मोकळ्या अंत:करणाने स्वीकाराव्या यासाठी ‘माणुसकीची भिंत’ रंगविण्यात आली आहे. नव्या वर्षाच्या सकाळी १ जानेवारीला या उपक्रमाचे रितसर उद्घाटन होणार आहे.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, यवतमाळातील काही संवेदनशील महिलांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. चापमनवाडी परिसरातील शिंदे नगरातील प्रसिद्ध साई मंदिरात ही ‘माणुसकीची भिंत’ निर्माण करण्यात आली आहे. मंदिराच्या दर्शनी भागातील भिंतीला आकर्षक पद्धतीने रंगविण्यात आले आहे. त्यावर कपडे, वस्तू ठेवण्यासाठी लोखंडी रॅक आणि तारा लावण्यात आल्या. समाजातील श्रीमंतांनी किंवा मध्यमवर्गीयांनीही आपल्याकडील जुन्या (किंवा नव्या) वस्तू येथे आणून ठेवाव्या. गरिबांनी त्या वस्तू वापरण्यासाठी घेऊन जाव्या, असा हा उपक्रम आहे. मोहिनी सचिन त्रिवेदी, दीपाली अग्रवाल, माधुरी पुराणिक, आरती बुरडकर, मालती पटेल, अश्रफ गिलाणी, कविता भोसले, पूजा रायचुरा या ग्रूपने हा उपक्रम सुरू केला आहे. नववर्ष दिनी रितसर उद्घाटन होणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना मोहिनी त्रिवेदी म्हणाल्या, आम्ही सर्व जणी एका व्हॉट्सअप ग्रूपमध्ये आहोत. त्यावरच आम्हाला अकोला, नागपूर येथील ‘माणुसकीच्या भिंती’बाबत कळले. मग आपण हा उपक्रम का राबवू नये, असा विचार केला. आम्ही प्रथम आमच्या व्हॉट्सग्रूपचे नाव बदलून ‘वॉल आॅफ ह्यूमॅनिटी’ असे केले. नंतर सर्व विचार करून साई मंदिरात अशीच भिंत निर्माण करण्याचा निर्णय घेतला.
भिंतीसाठी मंदिरच निवडले कारण मंदिरात गरजू माणसेच येत असतात. शिवाय येथे दानधर्म करणारेही येत असतात. आम्ही हा उपक्रम राबविणार असल्याचे कळताच पंकज कुंद्रे आणि पराग हेडाऊ या शिक्षकांनी स्वत: भिंत रंगवून दिली. तर वेल्डिंग वर्क व्यावसायिक नंदूरकर यांनी मोफत रॅक करून दिली. मंदिराच्या ट्रस्टी मजीठिया यांच्याकडूनही उपक्रमासाठी परवानगी मिळाली. हा उपक्रम यशस्वी झाल्यास महादेव मंदिर व अन्य ठिकाणीही माणुसकीची भिंत उभारू, असे त्रिवेदी म्हणाल्या. (स्थानिक प्रतिनिधी)