शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

देशातील द्वितीय दक्षिणमुखी शिवालय दुधगावात

By admin | Updated: August 24, 2015 00:10 IST

प्राचीन वास्तूकलेचा नमुना असलेली हेमाडपंथी भारतातील दुसरे दक्षिणमुखी शिवालय दारव्हा तालुक्यातील दूधगाव येथे आहेत.

हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक : मंदिरामुळे पाणीटंचाई मिटल्याची आख्यायिका पंचक्रोशीत प्रसिद्धसंतोष तांगडे बोरीअरबप्राचीन वास्तूकलेचा नमुना असलेली हेमाडपंथी भारतातील दुसरे दक्षिणमुखी शिवालय दारव्हा तालुक्यातील दूधगाव येथे आहेत. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी या मंदिरात भाविकांची मोठी वर्दळ असते. दारव्हा-यवतमाळ महामार्गावर बोरीअरबपासून दक्षिणेस तीन किलोमीटर अंतरावर दूधगाव आहे. तेथील दक्षिणमुखी शिवालय सर्वपरिचित आहे. प्राचीन वास्तूकलेचा नमुना कोरिव शिला असलेल्या या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिणमुखी आहे. मंदिराच्या आत समोरासमोर असे आणखी दोन मंदिरे आहेत. त्यात पुरातन शिवपिंड आहे. इतर ठिकाणची शिवालये पाहिली तर हे दक्षिणमुखी मंदिर दुर्मिळ व इतरांपेक्षा वेगळे असल्याचे जाणवते. दूधगावातील गावकरी या मंदिराला दैवत मानतात. भारतात दक्षिणमुखी शिवालय दोनच आहे. त्यातील एक उजैनमध्ये (मध्यप्रदेश) आहे. तर दुसरे महाराष्ट्रातील दूधगाव येथे आहे. दक्षिणमुखी शिवालयाचा पूर्व इतिहास जाणून घेतला तर तो रम्य आहे. दूधगाववरून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या तपोनेश्वर येथील मंदिराशी या शिवालयाचा संबंध जुळलेला आढळतो. येथे शंकरगिर महाराज म्हणून राहात होते. स्वातंत्र्यपूर्व काळात येथे अनेक सन्याशीही यज्ञ, तप करण्यासाठी येत होते. आलेल्या सन्याशांना ओळख देण्याचे काम शंकरगिर महाराज करीत होते. येथूनच पुढील प्रवास सुरू होत होता. देशातील इतर शिवालयांमध्ये त्यानंतरच त्यांना तप, यज्ञ करण्यासाठी परवानगी मिळत होती. या गावाशी एक अख्यायिका जुळलेली आहे. दूधगाव येथे दुष्काळ पडला होता. पाण्यासाठी गावकऱ्यांना वणवण भटकावे लागत होते. गावात हिंदू-मुस्लिम एकोप्याने राहतात. त्यांनी शिवभक्तांची आराधना केली. साकडे घातले. गावाच्या शेजारी डोहात खूप पाणी पडले. त्यानंतर गावात व तालुक्यात कुठेच पाणी पडले नाही. ही घटना त्यावेळी सर्व गावकऱ्यांनी पाहिल्याचे सांगितले जाते. गावाची पाणीटंचाईच मिटली. या घटनेची त्यावेळीही परिसरात मोठी चर्चा झाली होती. दक्षिणमुखी शिवालय येथील हिंदू-मुस्लिम दोन्ही समाजबांधवांचे श्रद्धास्थान बनले आहे. प्रत्येक श्रावण मासात गावातील तरुणवर्ग शिवनाम जप करतो. विशेष म्हणजे या एकाच मंदिराला दोन कळस आहेत. वेगवेगळ्या सोहळ्यात सर्वधर्म समभावाने विविध कार्यक्रम साजरे केले जातात. दुर्मिळ दक्षिणमुखी शिवालयाची पाहणी पुरातत्त्व विभागाने केली. मात्र मंदिर पुरातत्त्व विभागाने आपल्या ताब्यात घेतले नाही. १९९३ मध्ये आलेल्या भूकंपात येथील मंदिराचा कळस ढासळला होता. मंदिराच्या बाजूने आता सभामंडपाचे काम सुरू आहे. दुर्मिळ दक्षिणमुखी शिवालयाची प्रशासनाने दखल घ्यावी, अशी मागणी गावकरी करीत आहेत.