सातबारावर कापसाच्या बोगस नोंदी घेणाऱ्यांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 05:00 AM2020-05-29T05:00:00+5:302020-05-29T05:00:37+5:30

कापूस खरेदीच्या प्रश्नावर गुरुवारी बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीमध्ये जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, अकोला येथील सीसीआयचे जनरल मॅनेजर अजय कुमार, नागपूर येथील पणन महासंघाचे जनरल मॅनेजर महाजन आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीमध्ये विविध विषयांवर गंभीर चर्चा झाली. बोगस कापूस नोंदणीच्या नावावर बाजारात पणन महासंघाकडे कापूस वळता केला जात आहे.

Search for bogus cotton logs on Satbara | सातबारावर कापसाच्या बोगस नोंदी घेणाऱ्यांचा शोध

सातबारावर कापसाच्या बोगस नोंदी घेणाऱ्यांचा शोध

Next
ठळक मुद्देफौजदारी गुन्हे दाखल करणार : गावागावात ‘ स्पॉट पंचनामा’ करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी झाल्यानंतरही आणखी कापूस विक्रीचा पेच कायम आहे. यावर मात करण्यासाठी गावपातळीवर स्पॉट पंचनामे करून कापसाचा शोध घेतला जात आहे. यामध्ये बोगस नोंदणी करणाºया शेतकऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालकमंत्री संजय राठोड यांनी बैठकीत दिले.
कापूस खरेदीच्या प्रश्नावर गुरुवारी बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीमध्ये जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, अकोला येथील सीसीआयचे जनरल मॅनेजर अजय कुमार, नागपूर येथील पणन महासंघाचे जनरल मॅनेजर महाजन आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीमध्ये विविध विषयांवर गंभीर चर्चा झाली. बोगस कापूस नोंदणीच्या नावावर बाजारात पणन महासंघाकडे कापूस वळता केला जात आहे.
या प्रकाराला रोखण्यासाठी गावपातळीवर सहायक निबंधक, सोसायटीचे कर्मचारी आणि इतर मंडळींच्या उपस्थितीत नोंदणी करणाºया शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कापूस आहे की नाही याची पाहणी केली जात आहे. नोंदणी झालेल्या शेतकऱ्याकडे कापूस नसेल तर अशा प्रकरणात तत्काळ फौजदारी दाखल करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत.
काही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस विकला. त्यांच्याकडील सातबाऱ्यावर मोजक्या कापूस क्षेत्राची नोंद आहे. यामध्ये हेक्टरी उत्पादकता तपासली जाणार आहे. यानंतरही जास्त कापूस त्या शेतकऱ्याच्या नावावर विकला गेला असेल तर अशा शेतकºयांच्या नावाची यादी तयार करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत. अशा शेतकऱ्यांचे कापसाचे चुकारे रोखले जाणार आहे. शहानिशा करूनच त्यांचे चुकारे वळते केले जाणार आहे. या प्रकरणात गैरप्रकार करून कापूस विक्री झाल्यास त्यांच्यावरही फौजदारी कारवाई होणार आहे.

शेतकऱ्यांनो, व्यापाऱ्यांना सातबारा देऊ नका
व्यापारी शेतकऱ्यांचा सातबारा वापरुन त्याच्या नावावर मोठ्या प्रमाणात कापूस विकत आहे. यात शासनाची दिशाभूल केली जात आहे. अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी शेतकºयांनी व्यापाऱ्यांना सातबारा न देण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी केल्या आहेत.

Web Title: Search for bogus cotton logs on Satbara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस