शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

अवैध नळ जोडण्यांवर शिक्कामोर्तब

By admin | Updated: November 17, 2014 23:01 IST

शहरात प्राधिकरणाच्या पाण्याची चोरी होत असल्याच्या बाबीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. जागरुक नागरिकांनी केलेल्या तक्रारी आणि वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध वृत्तालाही खोडून काढण्याचा प्रयत्न

यवतमाळ : शहरात प्राधिकरणाच्या पाण्याची चोरी होत असल्याच्या बाबीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. जागरुक नागरिकांनी केलेल्या तक्रारी आणि वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध वृत्तालाही खोडून काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांची आता बोलती बंद झाली आहे. अवैधरीत्या नळ जोडण्या घेतलेल्यांविरुद्ध फौजदारी कारवाईची धमकीही या विभागाने दिली आहे. यवतमाळ शहर आणि लगतच्या ग्रामीण पंचायत क्षेत्राला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे पाणीपुरवठा केला जातो. यासाठी मोठमोठ्या पाईप लाईन टाकण्यात आल्या आहे. त्यावर छोट्या पाईप लाईनद्वारे घरोघरी पाणीपुरवठा केला जातो. मात्र काही लोकांनी मुख्य पाईप लाईन फोडून नळ जोडण्या घेतल्या आहे. या प्रकारात प्रामाणिकपणे पाणी घेणाऱ्यांवर अन्याय होत आहे. वाजवी पेक्षा आणि वापरा पेक्षा अधिक पाण्याचे बिल वसूल केले जात आहे. हा सर्व प्रकार पाणी चोरीच्या प्रकारातून होत आहे. ज्या भागात नवीन पाईपलाईन टाकण्यात आल्या, तेथे तर हमखास पाण्याची चोरी होत आहे. काही लोकांनी जुन्याच पाईपलाईनवरून जोडण्या सुरू ठेवल्या आहे. यामुळे टाकीतून सोडले जाणारे पाणी आणि बिलाचा ताळमेळ बसत नव्हता. तरीही प्राधिकरण शहरात पाण्याची चोरी होत नाही, असे ठामपणे सांगत होते. मात्र आता प्राधिकरणानेच विनापरवानगी नळ जोडणी घेतल्याच्या बाबीवर मोहोर लावली आहे. एवढेच नाही तर रितसर अर्ज, मंजुरी आणि आवश्यक शुल्काचा भरणा करून जोडण्या वैध करण्याची संधीही देण्यात आली आहे. यासाठी १ डिसेंबर ही मुदत देण्यात आली आहे. या तारखेपर्यंत जोडण्या वैध न झाल्यास पूर्व सूचना न देता नळ जोडण्या बंद आणि फौजदारी कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. वास्तविक या बाबी प्राधिकरणाने यापूर्वीच करायला पाहिजे होत्या. उशिरा जाग आली असली तरी प्रत्यक्ष काय कारवाई होते याकडे लक्ष लागेल आहे. (वार्ताहर)