शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

शाळा ऑफलाईन, शिक्षण ऑनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:00 IST

सोशल मीडियावरून पालकांमार्फत विद्यार्थ्यांना आवाहन करून व्हॉटसअप ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंक देण्यात आली. काही दिवसांतच व्हॉट्सअ‍ॅपचे चार ग्रुप फुल्ल झाले. प्रथम कोषटवार दौलतखान विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सीमित असलेला हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला. त्याची दखल घेत बंगलोर येथील अगस्त्य फाऊंडेशनचे सार्थक सपकाळ यांनी डीजिटल समर कॅम्प सुरू करण्यासाठी सहकार्य केले.

ठळक मुद्देपुसदमध्ये उन्हाळी शिबिर : ९०० विद्यार्थ्यांचा सहभाग, अगस्त्य फाऊंडेशनचे सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : येथील तंत्रस्नेही शिक्षक चंद्रकांत ठेंगे यांनी ऑनलाईन उन्हाळी वर्ग आणि प्रश्नावलीकरिता पुढाकार घेतला. लॉकडाऊनमुळे शाळा ऑफलाईन झाल्या, मात्र शिक्षण ऑनलाईन देण्याचा ध्यास त्यांनी घेतला.सोशल मीडियावरून पालकांमार्फत विद्यार्थ्यांना आवाहन करून व्हॉटसअप ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंक देण्यात आली. काही दिवसांतच व्हॉट्सअ‍ॅपचे चार ग्रुप फुल्ल झाले. प्रथम कोषटवार दौलतखान विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सीमित असलेला हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला. त्याची दखल घेत बंगलोर येथील अगस्त्य फाऊंडेशनचे सार्थक सपकाळ यांनी डीजिटल समर कॅम्प सुरू करण्यासाठी सहकार्य केले.ऑनलाईन उन्हाळी वर्ग सुरू करताच इतर शाळांतील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या विनंतीवरून नवीन समूह तयार करण्यात आले. आता सुमारे ९00 विद्यार्थी या ग्रुपला जोडले गेले. आजवर स्वरचित कविता, निबंध लेखन, कागद काम, टाकावूपासून टिकाऊ वस्तू तयार करणे आदी उपक्रम विद्यार्थ्यांना देण्यात आले. या विद्यार्थ्यांना डीजिटल प्रशस्तीपत्र देण्यात आले.विद्यार्थ्यांना घरबसल्या धडे मिळत असल्याने पालकांमध्येही समाधान आहे.विविध स्पर्धेतील विजेते विद्यार्थीस्वरचित कविता स्पर्धेत पहिली ते पाचवीच्या गटात मोहिनी वसंता जाधव, भक्ती भास्कर मदने, समर्थ अमित सुरोशे, वेदांत खंदारे, अनुज विशाल दरोडकार यांनी अनुक्रमे पहिला ते पाचवा क्रमांक पटकाविला. याच गटात इंग्रजी माध्यमात आदित्य संतोष किवले याने पहिला क्रमांक प्राप्त केला. सहावी ते नववीच्या गटात सार्थक संजय गावंडे, अमितेश अशोक शिरगिरे, गौरी शरद काळे, तनुश्री दिगंबर खंदारे, राहुल संतोष राठोड यांनी अनुक्रमे पहिला ते पाचवा, तर याच गटात इंग्रजी माध्यमात अमितेश अशोक शिरगिरे, अवंती चंद्रकांत ठेंगे, वेदिका वसंत जाधव यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक प्राप्त केला. श्रेया अभिजित सरनाईक, राधिका विजय देशमुख यांनी परीक्षण केले. या उपक्रमासाठी चंद्रकांत ठेंगे यांना संस्थाप्रमुख अ‍ॅड. उमेश चिद्दरवार, डॉ. आनंद मुखरे, श्रीकांत सरनाईक, मुख्याध्यापक वृंदा पलिकोंडावार, हरिदास बोके, गजानन वायकुळे, सुरेश धनवे, राजेंद्र महाजन आदींचे सहकार्य लाभले.

टॅग्स :Studentविद्यार्थी