शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

वाटखेड शाळेचा कारभार केवळ दोन शिक्षकांवर

By admin | Updated: August 22, 2014 00:09 IST

परिसरात येत असलेल्या वाटखेड येथील जिल्हा परिषद शाळेचा कारभार दोन शिक्षकांवर सुरू आहे. पाच तुकड्यांसाठी येथे दोन शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे.

हिवरी : परिसरात येत असलेल्या वाटखेड येथील जिल्हा परिषद शाळेचा कारभार दोन शिक्षकांवर सुरू आहे. पाच तुकड्यांसाठी येथे दोन शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. वाटखेड शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत तुकड्या आहे. एकूण शाळेची पटसंख्या ही ४८ इतकी आहे. या तुकड्यांसाठी चार शिक्षकांची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात मात्र येथील जागा अनेक दिवसांपासून रिक्त आहे. १०० टक्के आदिवासीबहुल असलेल्या या गावाकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष आहे. दोन शिक्षक, पाच तुकड्या शिकविण्यासाठी चांगलीच कसरत करतात. एकाच खोलीत दोन वर्ग आणि एक वर्ग वऱ्हांड्यात बसून मधोमध शिक्षकाचे अध्यापन कार्य चालते. पटसंख्या कमी असली तरी वेगवेगळ्या तुकड्यातील विद्यार्थ्यांना एकाच वेळी शिकवणे शक्य होत नाही. सुरू असलेला पाठ हा पाचवीचा आहे की दुसरीचा असा गोंधळ विद्यार्थ्यांचा होतो. प्राथमिक शिक्षण हा प्रत्येकाच्या जीवनाचा पाया समजल्या जातो. या वयात आत्मसात केलेले ज्ञान आणि रुजलेल्या संकल्पना जीवनभर उपयोगी पडतात. त्यामुळेच राज्य शासनाकडून प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी विविध योजना व उपक्रम राबविले जातात. वाटखेड येथे मात्र दुर्दैवाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यच धोक्यात आले आहे. या बाबत ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे वारंवार तक्रारी आणि निवेदने दिली. त्यानंतरही येथे शिक्षक देण्यात आला नाही. अजून किती दिवस दोन शिक्षकांच्या भरोशावर या शाळेचा गाडा चालणार असा प्रश्न आहे. शाळेतील इयत्ता पहिलीमध्ये ११ विद्यार्थी, इयत्ता दुसरी ९, इयत्ता तिसरी १२, इयत्ता चौथी ९, इयत्ता पाचवी ७ विद्यार्थी आहे.आता जिल्हापरिषद प्रशासनाने तातडीने शिक्षक दिला नाही तर ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन छेडण्याच्या हालचाली सुरू आहेत. शिक्षकाविना विद्यार्थ्यांचे अद्यापनच खोळंबले आहे. (वार्ताहर)