शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ंजिल्ह्यात ३० टक्के बियाणांचा तुटवडा

By admin | Updated: May 23, 2014 00:15 IST

जिल्ह्यात यावर्षी तीन लाख ९२ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होणार आहे. त्याकरीता दोन लाख २५ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची आवशकता आहे. प्रत्यक्षात एक लाख ७० हजार

यवतमाळ : जिल्ह्यात यावर्षी तीन लाख ९२ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होणार आहे. त्याकरीता दोन लाख २५ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची आवशकता आहे. प्रत्यक्षात एक लाख ७० हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. शेतकर्‍यांना आणखी सोयाबीन बियाण्याची गरज भासणार आहे. संभाव्य टंचाई लक्षात घेता कृषी विभागाकडून पर्यायी व्यवस्थेसाठी प्रयत्न केले जात आहे. बियाणे तुटवड्याची जिल्हा पातळीवर सोडवणूक करण्यासाठी कृषी अधिक्षकांनी महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत चांगल्या उगवन शक्तीचे सोयाबीन शेतकर्‍यांकडे आरक्षीत करण्याच्या सूचना तालुका कृषी अधिकार्‍यांना दिल्या. यावर्षी सोयाबीनच्या पेर्‍यात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. मुळातच बियाणे कंपन्याकडे सोयाबिनचे पुरेसे बियाणे शिल्लक नाही. त्यातुन सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कृषी अधिक्षक दत्तात्रय गायकवाड यांनी जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याचा तुटवडा भासल्यात उपाय योजनाची माहिती दिली. त्यामध्ये जिल्ह्यातील दोन हजार ४० गावामधील किती शेतकर्‍यांकडे सोयाबीन शिल्लक आहे, याची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. शिल्लक असलेले सोयाबीन उगवन शक्तीस पात्र आहे का याची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहे. असे पात्र बियाणे तुटवड्याच्या काळात शेतकर्‍यांकडून गाव पातळीवर वापरण्यात येणार आहे. सोयाबीनसोबतच आंतर पीक म्हणून तुरी, मुग, उडीदाची लागवड करण्याचे सूचविण्यात आले. आंतर पीकासोबत चांगल्या उत्पादनाकरीता बिज प्रक्रीया करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.खरीप हंगामात बोगस बियाणे शेतकर्‍यांच्या माथी मारले जाऊ नये म्हणून भरारी पथकाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्ह्यातील ८८९ गावांमध्ये सोयाबीनचे बियाणे शेतकर्‍यांकडे शिल्लक आहे. तीन हजार ९२३ शेतकर्‍यांकडे कृषी विभागाने संपर्क साधला आहे. या ठिकाणावरून २४ हजार ८६३ क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. शेतकर्‍यांच्या घरचे सोयाबीन उगवन शक्तीस पात्र ठरल्या नंतर त्या सोयाबीनवर प्रक्रीया करावी लागणार आहे. त्यासाठी थायरम आणि ट्रायकोडर्माची प्रक्रीया केल्यास बुरशी रोगावर नियंत्रण मिळविण्यास मदत होणार आहे. जिल्हयाला लागणारे बियाणे सोयाबीन कंपनीने पुरविण्याचे आश्वासन दिले आहे. त्या दृष्टीने काम सुरू आहे. मात्र वेळेवर कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी खरीपाच्या पेरणी पूर्वी बैठक घेण्यात आली आहे. शेतकर्‍यांना कोणतीच अडचण भासणार नाही. त्यांना दर्जेदार आणि योग्य बियाणे उपलब्ध होईल अशी तयारी करण्यात आली आहे, असे जिल्हा कृषी अधिक्षक दत्तात्रय गायकवाड यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. (शहर वार्ताहर)