शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीच्या लेकींचा कार्यगौरव

By admin | Updated: January 15, 2017 01:15 IST

सत्यशोधक महिला विचार मंच आणि सत्यशोधक अध्यापक महिला विचार मंचच्यावतीने क्रांतिज्योती

वैशाली डोळस यांचे मार्गदर्शन : सत्यशोधक महिला व अध्यापक महिला मंचचे आयोजन यवतमाळ : सत्यशोधक महिला विचार मंच आणि सत्यशोधक अध्यापक महिला विचार मंचच्यावतीने क्रांतिज्योती सावित्रीआई फुले जयंती समारोह घेण्यात आला. या कार्यक्रमात सुनीता प्रवीण अजमिरे, मृणालिनी दहीकर, लिलाताई साहेबराव राठोड यांचा त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल सत्कार करण्यात आला. येथील गुरुदेव मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी मायाताई गोबरे होत्या. प्रमुख वक्त्या म्हणून अ‍ॅड. वैशाली डोळस (औरंगाबाद) या लाभल्या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रीती ग्रेसपुंजे, डॉ. हर्षलता पेटकर, प्रा. सुजाता गवई, रेणूताई शिंदे, प्रा.डॉ. छाया महाले, मालाताई ठाकरे, कीर्तीताई चेटुले, लता सोनटक्के, प्रा. सविता हजारे, शशीकलाताई भवरे, विजुबाई कानंदे आदी उपस्थित होते. ‘स्त्रियांची क्रांती प्रेरणा - सावित्रीआई फुले’ या विषयावर बोलताना अ‍ॅड. वैशालीताई डोळस म्हणाल्या, स्त्रियांनी चौकटीतील मनुवादी विचार आणि समाज व्यवस्थेची चिकित्सा करणे गरजेचे आहे. आयुष्यात विज्ञानवादी होवून सावित्रीच्या विचार स्वातंत्र्याची व्याख्या समजून घ्यावी, असे त्या म्हणाल्या. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही समयोचित विचार मांडले. या कार्यक्रमात वंदना डगवार यांनी सावित्रीचा संदेश एकपात्री प्रयोगातून दिला. प्रास्ताविक सुनीता काळे, संचालन नम्रता खडसे, आभार संगीता डहाणे यांनी मानले. कार्यक्रमासाठी कमलताई खंडारे, माधुरी फेंडर, निता दरणे, वैशाली फुसे, कल्याणी मादेशवार, अनिता गोरे, मालती रत्ने, सुनंदा मडावी, रेखा कणाके, वंदना डवले, कल्पना नागरीकर, शोभना कोटंबे, रितू धवने, रितू ठवकर, वर्षा महाजन, प्रा. श्रद्धा धवने, उषा सोनटक्के, सरिता चानपुरकर आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)