शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनवर अधरवेलीचे जाळे

By admin | Updated: September 17, 2014 00:02 IST

सोयाबीनवर विविध किडींनी आक्रमण केले असताना आता त्यात अधरवेलीचीही भर पडली आहे. परपोशित या अधरवेलीने बाभूळगाव तालुक्यातील सोयाबीनवर अधरवेलीचे जाळे पसरले आहे.

बाभूळगाव : सोयाबीनवर विविध किडींनी आक्रमण केले असताना आता त्यात अधरवेलीचीही भर पडली आहे. परपोशित या अधरवेलीने बाभूळगाव तालुक्यातील सोयाबीनवर अधरवेलीचे जाळे पसरले आहे. यावर कोणतेही प्रतिबंधात्मक औषधी नाही. त्यामुळे अधरवेलीच्या विळख्यातील सोयाबीन नष्ट केल्याशिवाय पर्याय नसल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यावर्षी सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांना बसत आहे. त्यातून बचावलेले पीक बहरत आले असताना विविध किडींनी आक्रमण केले. मोझॅकसह इतर किडींमुळे पिकांचे नुकसान होत आहे. अशातच बाभूळगाव तालुक्यातील सोयाबीनच्या पिकावर अधरवेलीने आक्रमण केले आहे. गणोरी ते उमरी मार्गावर प्रकाशचंद छाजेड यांचे शेत आहे. या शेतात त्यांनी १२ एकर क्षेत्रात सोयाबीन व तुरीची लागवड केली. सद्यस्थितीत सोयाबीनला ८० ते १०० शेंगा आहेत. तूरही चांगली बहरत आली आहे. मात्र या सोयाबीनवर अमरवेलीने आपले जाळे पसरविले आहे. या वेलीने अनेक झाडे विळख्यात घेतली असून शेकडो झाडे वाळत आहे. औषधाची फवारणी करूनही ही वेल मरत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रकाशचंद छाजेड यांनी तर कृषी विभागाचा सल्ला घेतला. मात्र यावर कोणतेच औषध निघाले नसल्याचे सांगण्यात आले. तर इतर शेतकऱ्यांनी अधरवेल असलेली झाडे नष्ट करण्याचा सल्ला दिला. मात्र १०० ते ८० शेंगा असलेले सोयाबीनची झाडे नष्ट करताना शेतकऱ्यांचा जीव कासावीस होत आहे. (प्रतिनिधी)