शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

दु:ख शिवा; आयुष्य पळवा !

By admin | Updated: January 23, 2016 02:31 IST

शिवसैनिकांना स्वाभिमान शिकविणाऱ्या बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलांना शुक्रवारी शिवणयंत्रांचे वाटप करण्यात आले.

स्वाभिमानाचा संदेश : शेतकरी विधवांना शिवणयंत्र दिलेयवतमाळ : शिवसैनिकांना स्वाभिमान शिकविणाऱ्या बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलांना शुक्रवारी शिवणयंत्रांचे वाटप करण्यात आले. पैशांची मदत करण्यापेक्षा रोजगाराचे साधन देण्यात आले. तर शनिवारी शेतकरी महिलांसाठी आॅटोरिक्षा वाटपाची योजना सुरू होणार असल्याची माहितीही याच कार्यक्रमात देण्यात आली. मदतीसाठी सरकारकडे हात पसरण्यापेक्षा स्वयंरोजगार करीत शेतकरी महिलांनी स्वाभिमान जपावा, असा संदेश यावेळी देण्यात आला अन् हा स्वयंसिद्धतेचा मंत्र सांगण्यासाठी खुद्द बाळासाहेबांचे तरुण नातू आदित्य ठाकरे यांनी यवतमाळात पहिले वहिले जाहीर भाषण केले!शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील ६०० आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलांना शिवणयंत्रांचे वाटप करण्यात आले. येथील पोस्टल मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या भाषणाने युवासेनेच्या कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा दिली. भाषणाची सुरूवातीलाच आदित्य यांनी केलेल्या ‘जय महाराष्ट्र’ला शिवसैनिकांतून तडाखेबाज प्रतिसाद मिळाला. (स्थानिक प्रतिनिधी)