शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

सावळी रस्त्याची चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 05:00 IST

रस्त्याने दिवसरात्र ओव्हरलोड रेती वाहतूक केली जात आहे. रेतीची वाहने धावत आहे. रेती वाहतुकीने रस्त्याची पुरती वाट लागली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. परिणामी या रस्त्यावर नेहमी अपघात घडत आहे. त्यात अनेकांना अपंगत्व आले आहे. आर्णी ही बाजारपेठ व तालुक्याचे ठिकाण असल्याने याच रस्त्याने सावळीसदोबा परिसरातील जनतेला दररोज येथे यावे लागते.

ठळक मुद्देओव्हरलोड रेती वाहतूक : १५ गावातील ग्रामस्थांना नाहक त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : आर्णी ते सावळीसदोबा रसतयाची पूर्णत: चाळणी झाली आहे. रस्त ठिकठिकाणी उखडल्याने अपघातांत वाढ झाली आहे. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करणे कठीण झाले आहे.येथून सावळीसदोबाकडे जाताना प्रवाशांना दररोज जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. हा रस्ता तयार करण्यात आला, तेव्हापासूनच उखडण्यास सुरूवात झाली. विशेष म्हणजे या रस्त्याने दिवसरात्र ओव्हरलोड रेती वाहतूक केली जात आहे. रेतीची वाहने धावत आहे. रेती वाहतुकीने रस्त्याची पुरती वाट लागली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. परिणामी या रस्त्यावर नेहमी अपघात घडत आहे. त्यात अनेकांना अपंगत्व आले आहे.आर्णी ही बाजारपेठ व तालुक्याचे ठिकाण असल्याने याच रस्त्याने सावळीसदोबा परिसरातील जनतेला दररोज येथे यावे लागते. दररोज शेकडो नागरिक व विद्यार्थी दररोज या रस्त्याने ये-जा करतात. एसटी बस, अवैध प्रवासी वाहतूक वाहनेही याच रस्त्याने धावतात. मात्र रस्त्या पूर्णत: उखडल्याने दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांचे अपघात होत आहे. वाहन चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे या रस्त्याने होणारी रेती वाहतूक बंद करण्याची मागणी १५ गावांतील नागरिकांकडून होत आहे.नवीन रस्ता तयार करावाआर्णी ते सावळीसदोबा रस्त्याने रेतीची वाहतूक केली जाते. त्यामुळे रस्ता उखडला. आता नवीन रस्ता तयार करून द्यावा किंवा रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे. या रस्त्यावर जवळपास १५ गावे येतात. या गावांतील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन त्वरित उपाययोजना करावी, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा