शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

सीईओंच्या आदेशाने शाळेत तांदळाचे वाटप सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 05:00 IST

कोरोना रोखण्यासाठी शाळेत होणारी गर्दी टाळण्याच्या उद्देशाने सर्वच शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्या जाहीर करण्यात आल्या. आता तर १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित झाल्याने या सत्रातील शाळा भरण्याची शक्यताच नाही. दरम्यानच्या कालावधीत शालेय पोषण आहारासाठी प्रत्येक शाळेत एक ते दोन महिन्यांचा तांदळाचा साठा शिल्लक आहे. तर दुसरीकडे संचारबंदीमुळे बहुतांश पालकांचा रोजगारही थांबला आहे.

ठळक मुद्देपोषण आहार दोन महिन्यांपासून होता शिल्लक : जिल्हाभर शाळांमध्ये अंमलबजावणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनामुळे अचानक शाळांना सुट्या मिळाल्या. त्यामुळे तब्बल दोन महिन्यांचा पोषण आहाराचा तांदूळ पडून आहे. आता या तांदळाचे विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सोमवारी दिले. विशेष म्हणजे आदेश निघताच काही शाळांनी सोमवारीच वाटपही सुरू केले.कोरोना रोखण्यासाठी शाळेत होणारी गर्दी टाळण्याच्या उद्देशाने सर्वच शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्या जाहीर करण्यात आल्या. आता तर १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित झाल्याने या सत्रातील शाळा भरण्याची शक्यताच नाही. दरम्यानच्या कालावधीत शालेय पोषण आहारासाठी प्रत्येक शाळेत एक ते दोन महिन्यांचा तांदळाचा साठा शिल्लक आहे. तर दुसरीकडे संचारबंदीमुळे बहुतांश पालकांचा रोजगारही थांबला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबीयांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर आहे.ही स्थिती लक्षात घेता शालेय पोषण आहाराच्या धान्याची विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटप करण्याचे राज्य स्तरावरून निर्देश प्राप्त झाले. त्यानुसार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सोमवारी सर्व गटशिक्षणाधिकाºयांना आदेश दिले. आदेश निघताच लोहारा येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत पालकांना बोलावून धान्य वाटप करण्यात आले. धान्य वाटप करताना संचारबंदीचे, सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना आहे. त्यानुसार लोहारा शाळेतही आवारात ठराविक अंतरावर वर्तुळ रेखाटून त्या वर्तुळातच पालकांना उभे ठेवून धान्य वाटप करण्यात आले.शिक्षक बदल्यांच्याही हालचालीजिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली धोरणात सुधारणा करण्यासाठी पुणे सीईओच्या नेतृत्वातील अभ्यास गटाचा अहवाल शासनाला सादर झाला आहे. त्यानुसार बदली प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी पुण्याच्या एनआयसी सेंटरमधील संगणकीय प्रणालीत बदल करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले. त्यामुळे संचारबंदीत घरी बसलेल्या शिक्षकांमध्ये पुन्हा एकदा बदल्यांची चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या