शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचारी क्रीडा कल्याण निधीची चौकशी

By admin | Updated: January 20, 2015 00:15 IST

महसूल कर्मचारी क्रीडा व कल्याण निधीच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून त्यासाठी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : आरडीसींच्या नेतृत्वात समिती यवतमाळ : महसूल कर्मचारी क्रीडा व कल्याण निधीच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून त्यासाठी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. महसूल कर्मचारी क्रीडा व कल्याणासाठी दरवर्षी निधी गोळा केला जातो. सध्या यासाठी सुमारे सव्वा कोटी रुपयांचा निधी जमा आहे. या निधीसंबंधी जिल्हाधिकाऱ्यांकडे दोन आठवड्यांपूर्वी तक्रार करण्यात आली होती. त्या अनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खेवले यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आली. लेखाधिकारी कदम हे या समितीचे सदस्यसचिव असून सदस्य म्हणून वर्ग २ च्या लेखाधिकाऱ्यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. सुमारे आठवडाभरापासून ही चौकशी सुरू आहे. महसूल कर्मचारी क्रीडा कल्याण निधीचा गैरवापर होतो आहे, त्याचे रजिस्ट्रेशन नाही, महसूलच्या इमारत बांधकामाची परवानगी घेतली गेली नाही, असे तक्रारीत नमूद आहे. सदर निधी आणि संस्थेची धर्मदाय आयुक्ताकडे रितसर नोंदणी करावी, त्याचे आॅडिट करावे, अशी मागणी या तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान महसूल कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांची भेट घेऊन चौकशी समितीचे अध्यक्ष बदलविण्याची मागणी केली. त्यामागील कारणेही विशद केली. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशीची सूत्रे अन्य कुणाकडे देण्याचे मान्य केल्याचे सांगितले जाते. (प्रतिनिधी)