शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

सहायक फौजदाराची निवृत्ती ठरली सेवेचा आदर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 05:00 IST

काल मंगळवारी लोहारा चौकात बंदोबस्तावर असतानाच या फौजदाराला सहकाऱ्यांनी निरोप दिला. लोहारा पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार अशोक कांबळे यांनी १९८७ मध्ये जिल्हा पोलीस दलात प्रवेश केला. पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक असा त्यांचा सेवेचा प्रवास आहे. सेवेतील काही काळ त्यांनी पोलीस उपनिरीक्षक म्हणूनही कामकाज केले आहे.

ठळक मुद्देसुट्यांवर पाणी सोडून कोरोना बंदोबस्तात : ३५ वर्षांच्या सलग सेवेला कर्तव्यावरच सहकाऱ्यांचा निरोप

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणूने सर्वत्र हाहाकार निर्माण केला आहे. भल्याभल्यांना या विषाणूच्या संसर्गाची भीती आहे. अनेक तज्ज्ञ डॉक्टरही सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने विविध कारणे पुढे करून सेवा देणे टाळत आहे. अशा वातावरणात सेवानिवृत्ती तोंडावर आली असताना व हक्काच्या तीन महिन्यांच्या रजा शिल्लक असतानाही लोहारा पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराने निवृत्तीच्या शेवटच्या मिनिटापर्यंत खात्याची सेवा केली. काल मंगळवारी लोहारा चौकात बंदोबस्तावर असतानाच या फौजदाराला सहकाऱ्यांनी निरोप दिला.लोहारा पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार अशोक कांबळे यांनी १९८७ मध्ये जिल्हा पोलीस दलात प्रवेश केला. पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक असा त्यांचा सेवेचा प्रवास आहे. सेवेतील काही काळ त्यांनी पोलीस उपनिरीक्षक म्हणूनही कामकाज केले आहे. पोलीस दलातील सेवा ही सलग व सुरळीत करण्याची संधी नशिबवान व्यक्तीलाच मिळते. सतत वेगवेगळ्या घडामोडी व शिस्तीचं खातं असल्याने थोडीशीही चूक महागात पडणारी असते. मात्र अशोक कांबळे यांनी आपल्या काटेकोर शिस्तीचे पालन करून प्रामाणिकपणे पोलीस म्हणून समाजाची सेवा केली. मिळेल ती जबाबदारी त्यांनी पूर्ण क्षमतेने पार पाडली. कोरोना विषाणू संसर्गाने संपूर्ण जग होरपळत आहे. अनेकजणांनी विविध कारणं सांगून या काळात स्वत:ला सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आपल्या कर्तव्याला प्रथम मानत हक्काच्या रजांवर पाणी सोडून कांबळे यांनी कोरोना विषाणू बंदोबस्तासाठी सेवा दिली. लोहारा चौकात बंदोबस्तावर असतानाच मंगळवार, ३१ मार्चला सायंकाळी त्यांनी निवृत्ती स्वीकारली. ठाणेदार सचिन लुले व सहकारी कर्मचाºयांनी त्यांचा येथेच छोटेखानी निरोप समारंभ घेतला. या कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्याची माहिती मिळताच खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी त्यांची भेट घेऊन सेवेचा हा आदर्श इतरांनीही घेण्यासारखा आहे, अशा शब्दात भावना व्यक्त केल्या. कर्तव्यनिष्ठतेबाबत अशोक कांबळे यांची माहिती पोलीस महासंचालक कार्यालयाकडेही पाठविण्यात आली. कांबळे यांच्या एकंदरच सेवेपेक्षा त्यांची निवृत्ती ही सर्वांनाच आदर्श देणारी आहे.वडील दुसऱ्या महायुद्धात लढलेकांबळे यांना शिस्तीचे बाळकडू वडिलांपासून मिळाले. कांबळे यांचे वडील दुसऱ्या महायुद्धात मित्र राष्ट्राचे सैनिक म्हणून लढले. घरची परिस्थिती बेताची असतानाही कांबळे यांनी फुटबॉलपटू म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. याच आधारावर बी.ए.च्या पहिल्या वर्षालाच त्यांची पोलीस दलात निवड झाली. वडिलांचे संस्कार व शिस्त याचे पालन करत अशोक कांबळे यांनी समाजाची सेवा केली.

टॅग्स :Policeपोलिस