शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेदारासह फिर्यादीचे नोंदवले बयाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 05:00 IST

अवधूतवाडी पोलिसांनी फसवणुकीसह विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. तसेच माजी आमदार विजयाताई धोटे यांनी जी तक्रार दिली त्यासंदर्भातही जमिनीचा ताबा घेण्याकरिता पोलिसांकडूनच रितसर परवानगी मिळाली. तरीही आकसापोटी पोलीस कारवाई करीत असल्याचे बाजोरिया यांनी तक्रारीत नमूद केले. याच तक्रारीच्या अनुषंगाने मंगळवारी अवधूतवाडी ठाणेदार मनोज केदारे यांचा जबाब घेण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील भूखंडाच्या तक्रारी संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. सुमीत बाजोरिया यांनी पोलिसांकडून त्यांच्याविरोधात चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्याची तक्रार राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे केली. या तक्रारीची चाैकशी करण्यासाठी खुद्द पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना मंगळवारी यवतमाळात आले होते. याशिवाय त्यांनी दुर्गा विसर्जन काळातील पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेतला. सुमीत बाजोरिया यांनी ९ सप्टेंबर रोजी महासंचालकाकडे तक्रार करून अवधूतवाडी पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केल्याचे सांगितले. ज्या जमिनीच्या संदर्भात दिवाणी न्यायालयात दावा दाखल झाला यात निकालही लागला. त्याच संदर्भात अवधूतवाडी पोलिसांनी फसवणुकीसह विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. तसेच माजी आमदार विजयाताई धोटे यांनी जी तक्रार दिली त्यासंदर्भातही जमिनीचा ताबा घेण्याकरिता पोलिसांकडूनच रितसर परवानगी मिळाली. तरीही आकसापोटी पोलीस कारवाई करीत असल्याचे बाजोरिया यांनी तक्रारीत नमूद केले. याच तक्रारीच्या अनुषंगाने मंगळवारी अवधूतवाडी ठाणेदार मनोज केदारे यांचा जबाब घेण्यात आला. शिवाय तक्रारदार प्रकाश टकले याचाही जबाब घेण्यात आला. 

पोलीस वसाहतीच्या कामांचीही घेतली माहिती - उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दुर्गोत्सव काळात बंदोबस्ताचा आढावा घेतला. याशिवाय पोलीस वसाहतीचे बांधकाम, पोलिसांसाठीचे गणवेश खरेदी प्रक्रियेचीही माहिती त्यांनी घेतली. सकाळी ११ वाजता उपमहानिरीक्षक पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले. दुपारी २ वाजेपर्यंत बैठक चालली. या बैठकीला पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डाॅ. खंडेराव धरणे व तीन उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :Policeपोलिस