शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

मजुरीवर पाणी सोडून बँकेत हजेरी

By admin | Updated: November 12, 2016 01:45 IST

घरात असलेल्या ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी प्रसंगी मजुरीवर पाणी सोडून बँकेत हजेरी लावली जात आहे.

नोटा बंदची धास्ती : सोनखास, उत्तरवाढोणा बँकेत गर्दीसोनखास : घरात असलेल्या ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी प्रसंगी मजुरीवर पाणी सोडून बँकेत हजेरी लावली जात आहे. नोटा बंदची धास्ती घेतलेल्या या नागरिकांची सोनखास आणि उत्तरवाढोणा येथील बँकेत प्रचंड गर्दी झाली आहे. सकाळपासूनच बँकेसमोर रांगा लागत आहे. युवक, वृद्ध मंडळींचीही गर्दी याठिकाणी झाल्याचे चित्र आहे. बुधवारी ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्याचे वृत्त प्रसार माध्यमांद्वारे गावखेड्यापर्यंत पोहोचले. त्याच रात्रीपासून जवळ असलेल्या नोटांचे काय, हा भीतीयुक्त प्रश्न निर्माण झाला. जवळचे पैसे सुरक्षितच राहील हे स्पष्ट केल्यानंतरही अनेक नागरिकांनी जवळची जमापुंजी बँकेत जमा करण्यासाठी धडपड चालविली. यात लहान व्यावसायिकांपासून ते मजूर वर्ग, शेतकऱ्यांनी बँकेत गर्दी केली. घरात असलेली ५०० रुपयांची एक नोटही बँकेत भरण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे. सेंट्रल बँक आॅफ इंडियाची उत्तरवाढोणा शाखा आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मालखेड(खुर्द) येथील शाखेतील गर्दी बँकेचे दार बंद होईपर्यंत कायमच होती. शिवाय वापरासाठी पैसा नसल्याने रक्कम काढणाऱ्यांचीही त्यात भर पडली. एक हजार ते दोन हजार रुपयांच्या रकमेचा विड्रॉल दिला जात होता. शुक्रवारी सदर दोनही गावातील एटीएम सुरू झाले नव्हते. त्यामुळेही रक्कम काढणाऱ्यांचा लोंढा बँकेत होता. (वार्ताहर)