शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयात दलालांचा सुळसुळाट

By admin | Updated: January 12, 2016 02:16 IST

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेला लुटणारी टोळीच शहरातील विविध शासकीय कार्यालयात कार्यरत दिसून येते.

सामान्यांची लूट : अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नेमले एजंटउमरखेड : शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेला लुटणारी टोळीच शहरातील विविध शासकीय कार्यालयात कार्यरत दिसून येते. सरळ अधिकाऱ्यांकडे गेल्यास कामच होत नाही, तर दलालांच्या माध्यमातून काही तासातच काम होवून जाते. यामुळे अनेकजण दलालाच आधार घेत आहे, तर दुसरीकडे काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एजंट नेमल्याची माहिती आहे.घरकूल योजना, शिधापत्रिका, विधवा पेन्शन योजना, अपंग वेतन, कृषी विभाग, तहसील कार्यालय आदींमध्ये विविध कामांसाठी ग्रामीण भागातील नागरिक येतात. मात्र या ठिकाणी येणाऱ्यांना योजनेचा लाभ कसा घ्यावी, याची माहितीच नसते. अधिकाऱ्यांना विचारावे तर ते उडवाउडवीची उत्तरे देतात. एका कामासाठी अख्खा दिवस जावूनही त्या दिवशी काम होत नाही. मजुरी बुडवून शासकीय कार्यालयात आलेल्यांना निराश होऊन परत जावे लागते. आर्थिक फटकाही सहन करावा लागतो. त्यामुळे अशी मंडळी दलालाच्या विळख्यात अडकतात. विविध कामे ही मंडळी अवघ्या काही वेळातच करून देत असल्याने नागरिकही पैसे देऊन त्यांच्याकडून कामे करून घेतात. शासकीय कार्यालयात दलाल अधिकारी, कर्मचाऱ्याच्याच तोरात वावरताना दिसून येतात. अनेकदा तर ही मंडळी अवघ्या काही तासात कामही करून देतात. या मंडळींचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत साटेलोटे असल्याचे दिसून येते. काही अधिकाऱ्यांनी तर थेट आपले एजंट नेमल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)सर्वाधिक गर्दी तहसील कार्यालयातशहरातील विविध कार्यालयात दररोज गर्दी असतेच. परंतु सर्वाधिक गर्दी असते ती तहसील कार्यालयात विविध प्रमाणपत्रांसाठी नागरिक येथे येतात. तासन्तास ताटकळत बसतात. अशा गरजू लोकांना हेरण्याचे काम दलाल करतात. पैसे घेऊन त्यांचे काम करून देतात. अनेकदा तर पैसे देणाऱ्याचीही तक्रार नसते. केवळ काम झाले याचेच समाधान असते.