सिंचन शोधयात्रेने अनुभवले बेंबळा प्रकल्पाचे वास्तव

By Admin | Updated: August 24, 2015 00:05 IST2015-08-24T00:05:15+5:302015-08-24T00:05:15+5:30

कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या बेंबळा प्रकल्पाचे वास्तव अनुभवण्यासाठी जनमंचच्या पुढाकारात विदर्भ सिंचन शोध यात्रेने रविवारी कालवा क्षेत्रातील ३० किलोमीटरचा प्रवास केला.

The reality of the Bembo project, which was experienced by irrigation | सिंचन शोधयात्रेने अनुभवले बेंबळा प्रकल्पाचे वास्तव

सिंचन शोधयात्रेने अनुभवले बेंबळा प्रकल्पाचे वास्तव

नागरिकांच्या तक्रारी : कालवा क्षेत्रातून ३० किलोमीटरचा प्रवास
कोपरा जानकर (बाभूळगाव) : कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या बेंबळा प्रकल्पाचे वास्तव अनुभवण्यासाठी जनमंचच्या पुढाकारात विदर्भ सिंचन शोध यात्रेने रविवारी कालवा क्षेत्रातील ३० किलोमीटरचा प्रवास केला. यावेळी त्यांनी या प्रकल्पाची पाहणी करताना नागरिकांनी पदाधिकाऱ्यांपुढे समस्यांचा पाढा वाचला. यावेळी उपस्थित आमदारांनाही जाब विचारला.
विदर्भ सिंचन शोधयात्रा रविवारी बेंबळा प्रकल्पावर धडकली. विश्रामगृहावर प्रकल्पग्रस्त, अधिकारी आणि आमदार यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. बेंबळा प्रकल्पाची माहिती अधिकारी सांगत होते. त्यावेळी ही माहिती दिशाभूल करणारे असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती खोडून काढण्यात येत होती. याबाबीचे वास्तव जाणून घेण्यासाठी प्रकल्पाची पाहणी करण्याचा प्रस्ताव पुढे आला. (प्रतिनिधी)
प्रकल्पग्रस्तांची बाजू नि:शुल्क मांडणार
बेंबळा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि मोबदला प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहे. ही प्रकरणे आपण विनाशुल्क लढण्यासाठी तयार असल्याची माहिती जनमंचचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी यावेळी दिली.

Web Title: The reality of the Bembo project, which was experienced by irrigation