यवतमाळात खासदारांच्या घरासमोर राखरांगोळी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 06:44 PM2020-09-23T18:44:10+5:302020-09-23T18:45:56+5:30

केंद्र सरकारने कांद्यावर आणलेली निर्यातबंदी तत्काळ मागे घ्यावी, या मागणीसाठी बुधवारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या घरासमोर राखरांगोळी आंदोलन केले.

Rakhrangoli agitation in front of MP's house in Yavatmal | यवतमाळात खासदारांच्या घरासमोर राखरांगोळी आंदोलन

यवतमाळात खासदारांच्या घरासमोर राखरांगोळी आंदोलन

Next
ठळक मुद्देकांदा, निर्यातबंदी अध्यादेशाची होळीशेतकरी संघटनेचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : केंद्र सरकारने कांद्यावर आणलेली निर्यातबंदी तत्काळ मागे घ्यावी, या मागणीसाठी बुधवारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या घरासमोर राखरांगोळी आंदोलन केले.
यवतमाळातील समर्थवाडीस्थित घरासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कांदा आणि निर्यातबंदी अध्यादेशाची होळी करण्यात आली. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केंद्रातील भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र झोटिंग, विदर्भराज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष कृष्णराव भोंगाडे, जयंतराव बापट, भास्करराव महाजन, नाना खांदवे, इंदरचंद बैद, विजय निवल, हिम्मतराव देशमुख, चंद्रशेखर देशमुख, महिला आघाडी प्रमुख प्रज्ञा बापट आदी सहभागी झाले होते.

Web Title: Rakhrangoli agitation in front of MP's house in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.