शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने खरिपातील पिकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 05:00 IST

रस शोषण करणाऱ्या किडी आक्रमक झाल्या होत्या. यामुळे पात्या आणि फुलांवर आलेल्या कापसाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. याशिवाय सोयाबीन फुलाच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी शेंगाही धरल्या आहेत. पाण्याअभावी या शेंगा गळण्याची शक्यता होती. आता पाऊस आल्याने पीक परिस्थिती सुधारण्यास मोठी मदत होणार आहे. याशिवाय ज्वारीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात चिकटा आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत १८ दिवसांपासून जिल्ह्यातून पाऊस गायब झाला होता. उन्हाच्या वाढत्या चटक्याने पिके करपण्यास सुरुवात झाली होती. पावसात खंड पडल्याने रस शोषण करणाऱ्या किडींचे पिकांवर मोठ्या प्रमाणात आक्रमण झाले होते. यामुळे उत्पन्नाला मोठा फटका बसणार होता. अशा परिस्थितीत वरुण राजाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील पिकांना जीवदान मिळाले आहे. अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. खरिपातील कपाशीच्या पिकावर पांढऱ्या माशीने हल्ला चढविला होता. याशिवाय रस शोषण करणाऱ्या किडी आक्रमक झाल्या होत्या. यामुळे पात्या आणि फुलांवर आलेल्या कापसाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. याशिवाय सोयाबीन फुलाच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी शेंगाही धरल्या आहेत. पाण्याअभावी या शेंगा गळण्याची शक्यता होती. आता पाऊस आल्याने पीक परिस्थिती सुधारण्यास मोठी मदत होणार आहे. याशिवाय ज्वारीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात चिकटा आला होता. तर मूग आणि उडीद या दोन्ही पिकांना पावसाची नितांत आवश्यकता होती. शेवटच्या क्षणाला पाऊस बरसल्याने हातातोंडाशी येणारे पीक वाचले आहे. सलग ३६ तासापासून कोसळणाऱ्या पावसाने शहरातील रस्तेही स्वच्छ केले आहे. 

जिल्ह्यात पिकांना संजीवनी देणारा पाऊस झाला आहे. अनेक दिवसांपासून पावसामध्ये खंड होता. यामुळे पीक परिस्थिती चिंताजनक झाली होती. आता पाऊस बरसल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. - नवनाथ कोळपकरजिल्हा कृषी अधीक्षक, यवतमाळ.

 

टॅग्स :Rainपाऊस