पुसद, उमरखेड उपविभागाला पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 05:00 AM2020-06-04T05:00:00+5:302020-06-04T05:00:24+5:30

गेल्या दोन दिवसांपासून पुसद शहर व तालुक्यात वादळी पाऊस कोसळत आहे. बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास वादळी पावसाने हजेरी लावली. यात फेट्रा येथील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक डिजीटल शाळेवरील टीनपत्रे उडून गेली. यामुळे जवळपास दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गेल्या दोनही दिवसांपासून शहर व तालुक्यात विजांचा कडकडाट सुरू आहे.

Rains hit Pusad, Umarkhed sub-division | पुसद, उमरखेड उपविभागाला पावसाचा तडाखा

पुसद, उमरखेड उपविभागाला पावसाचा तडाखा

Next
ठळक मुद्देफेट्रा शाळेचे छप्पर उडाले : उमरखेड, दिग्रस, महागाव तालुक्यातही दमदार हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : गेल्या दोन दिवसांपासून पुसद, उमरखेड, दिग्रस व महागाव तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बुधवारी वादळामुळे पुसद तालुक्यातील फेट्री येथील जिल्हा परिषद शाळेचे छप्पर उडाले.
गेल्या दोन दिवसांपासून पुसद शहर व तालुक्यात वादळी पाऊस कोसळत आहे. बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास वादळी पावसाने हजेरी लावली. यात फेट्रा येथील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक डिजीटल शाळेवरील टीनपत्रे उडून गेली. यामुळे जवळपास दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गेल्या दोनही दिवसांपासून शहर व तालुक्यात विजांचा कडकडाट सुरू आहे. रविवारपासून सतत मान्सूनपूर्व पाऊस येत आहे. यामुळे शेतकरी आनंदले आहे. मात्र वादळामुळे काही गावांमध्ये नुकसान होत आहे.
फेट्रा येथील शाळेवरील टिनपत्रे उडाल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी संजय कांबळे यांनी दिली. या शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आहे. जवळपास ३०० विद्यार्थी शिकतात. तेथे आठ शिक्षक कार्यरत आहे. सध्या शाळेला सुटी असल्यामुळे जीवित हानी टळली. या शाळेची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
उमरखेड तालुक्यातही पाऊस

उमरखेड शहरासह तालुक्यातही बुधवारी दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे बळीराजा पेरणीच्या लगबगीला लागला आहे. मान्सूनपूर्व कामांना गती दिली जात आहे. वातावरणातही गारवा निर्माण झाला आहे.
दिग्रस तालुक्याला पावसाने झोडपले
दिग्रस तालुक्यातही गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. बुधवारीसुद्धा पावसाने झोडपून काढले. दिवसभर ढगाळ वातावरण होते.
महागाव तालुक्यात जोरदार पाऊस
महागाव तालुक्यातही बुधवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळला. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली होती.

Web Title: Rains hit Pusad, Umarkhed sub-division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस