शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे शेतमाल वाहतुकीचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST

खरिपाची पिके घरात येतानाची वेळ असतानाच जोरदार पाऊस झाला. सोयाबीन मातीमोल झाले. जे काही हाती लागले त्याला बाजारात भाव मिळाला नाही. काहींचा लागवड खर्चही निघाला नाही. यातून सावरण्याचा प्रयत्न म्हणून खरिपाची पिके घेतली. गहू, हरभरा यासोबतच जोडीला भाजीपाला लावण्यात आला. गेली काही दिवसांपासून अवकाळी पाऊस, गारा सुरू आहे.

ठळक मुद्देभाजीपाला सडतोय : कवडीमोल दरात विक्री, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : संकटाच्या मालिकेला तोंड देता देता शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. अस्मानी, सुलतानी संकटातून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच आता कोरोनाचा विळखा पडला आहे. हे संकट कमी की काय, म्हणून नैसर्गिक आपत्ती त्यात भर घालत आहे. खरिपाची पिके आणि भाजीपाला यावर संपूर्ण वर्षभराची मदार आहे. मात्र अवकाळी पाऊस, संचारबंदीमुळे माल वाहतुकीत येणारे अडथळे यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.खरिपाची पिके घरात येतानाची वेळ असतानाच जोरदार पाऊस झाला. सोयाबीन मातीमोल झाले. जे काही हाती लागले त्याला बाजारात भाव मिळाला नाही. काहींचा लागवड खर्चही निघाला नाही. यातून सावरण्याचा प्रयत्न म्हणून खरिपाची पिके घेतली. गहू, हरभरा यासोबतच जोडीला भाजीपाला लावण्यात आला. गेली काही दिवसांपासून अवकाळी पाऊस, गारा सुरू आहे. यामध्ये वाळलेला गहू झोपला. काहींची गहू काढण्याची तयारी सुरू असतानाच पावसाने त्यावर पाणी फेरले. हरभऱ्याचीही माती झाली. शेतात असलेला भाजीपालाही सडण्याच्या मार्गावर आला. पालक, सांभार, चवळी, घोळ या भाज्या हाती लागल्या नाही. टमाटे, भेंडी, चवळीच्या शेंगा, कारले आदी भाज्या काही ठिकाणी खराब झाल्या. राहिलेला माल बाजारात विकून पैसा करण्याचा मनसूबा असतानाच कोरोनामुळे अडथळे निर्माण होत आहे. शेतातून तोडलेला माल शहरात विकण्यासाठी नेत असतानाच टाळेबंदीचा सामना करावा लागत आहे. मार्गात जागोजागी होणारी चौकशी, चौकशी करणाऱ्यांचे समाधान झाले नाही तर दंडुके याबाबींना तोंड द्यावे लागत आहे. कसाबसा मंडईत गेलेला माल अतिशय कमी दराने विकावा लागत आहे. कधीकधी तर वाहतूक खर्चही निघत नाही. शेतातील भाजीपाला तोडण्यासाठी मजूर वर्ग उपलब्ध होत नाही. या सर्व परिस्थितीतून मार्ग काढताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले. जणू त्यांच्या विकासालाच टाळे लागल्याचे चित्र आहे.टरबूजाचा दर तीन रुपये किलोटरबूज ठोक भावात केवळ तीन रुपये किलो दराने विकावे लागत आहे. युवा शेतकऱ्यांच्या प्रयत्नावर यामुळे पाणी फेरले जात आहे. तालुक्यात जवळपास ४० युवकांनी टरबुजाची शेती केली आहे. लॉकडाऊनमुळे तुरीच्या खरेदीलाही सुरुवात झाली नाही. केवळ आॅनलाईन नोंदणी करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहे.

टॅग्स :agricultureशेती