पुसदच्या दोघांचे नगरसेवकपद रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 06:00 AM2019-12-29T06:00:00+5:302019-12-29T06:00:10+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या प्रत्येकी एका नगरसेवकाचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरले. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश येथे शुक्रवारी धडकले. यात प्रभाग क्रमांक ‘अ’धून विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख फिरोज शेख अफसर आणि प्रभाग क्रमांक ११ ‘अ’मधून निवडून आलेल्या शिवसेनेच्या सीमा महाजन यांचा समावेश आहे.

Pusad's two councilors canceled | पुसदच्या दोघांचे नगरसेवकपद रद्द

पुसदच्या दोघांचे नगरसेवकपद रद्द

Next
ठळक मुद्देजात प्रमाणपत्र अवैध । शिवसेना, राष्ट्रवादी

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : २०१६ मध्ये झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत नागरिकांच्या मागास प्रवर्गातून विजयी झालेल्या दोन सदस्यांचे पद रद्द ठरविण्यात आले. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला झटका बसला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या प्रत्येकी एका नगरसेवकाचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरले. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश येथे शुक्रवारी धडकले. यात प्रभाग क्रमांक ‘अ’धून विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख फिरोज शेख अफसर आणि प्रभाग क्रमांक ११ ‘अ’मधून निवडून आलेल्या शिवसेनेच्या सीमा महाजन यांचा समावेश आहे.
या दोघाचेही नागरिकांचा मागास प्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्णय जिल्हा जात पडताळणी समितीने २०१७ मध्ये दिला होता. त्या निर्णयाला कोणत्याही न्यायालयाने स्थगिती दिली नाही. त्यामुळे प्रभारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी महाराष्ट्र न.प., न.पं. व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम १६ पोटकलम १ (क), (ब) च्या तरतुदीनुसार दोन्ही नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द केले.
त्या संबंधीचे आदेश शुक्रवारी येथे धडकले. या आदेशात सदस्यत्व रद्द झालेल्या नगरसेवकांना आगामी ६ वर्षांसाठी कोणतीही निवडणूक लढता येणार नसल्याचेही नमूद केले आहे.

पक्षीय बलाबल प्रभावित होणार
येथील २९ सदस्यीय पालिकेत नगराध्यक्ष अनिताताई मनोहरराव नाईक यांच्यासह १२ सदस्य होते. भाजपकडे १०, काँग्रेस तीन, तर शिवसेनेकडे चार सदस्य होते. आता राष्ट्रवादी व शिवसेनेचा प्रत्येकी एक सदस्य कमी झाला. त्यामुळे गेल्या ३ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला जानेवारीत होणारी विषय समित्यांची निवडणूक जड जाण्याचे संकेत आहे. ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे. त्यात महाविकास आघाडीचा प्रयोग होतो का, याची चाचपणी सुरू झाली आहे. मात्र शिवसेना बांधकाम समितीसाठी आग्रही राहण्याची शक्यता बळावली आहे.

Web Title: Pusad's two councilors canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.